Krushnaraj Mahadik : रिंकू राजगुरूसोबतच्या 'त्या' फोटोबाबत कृष्णराज महाडिक पहिल्यांदाच बोलले; म्हणाले आम्ही दोघांनी ठरवून...
Krushnaraj Mahadik, Kolhapur : रिंकू राजगुरूसोबतच्या 'त्या' फोटोची नेमकी कहाणी काय? कृष्णराज महाडिकांनी सगळं सांगितलं; म्हणाले आम्ही दोघांनी ठरवून...

Krushnaraj Mahadik, Kolhapur : भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे सुपूत्र कृष्णराज महाडिक (Krushnaraj Mahadik) आणि अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) या दोघांचा अंबाबाईच्या मंदिरातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी काही दिवसांपूर्वीच कृष्णराजचं या वर्षी लग्न उरकायचं आहे, असं म्हटलं होतं. त्यामुळे कृष्णराज महाडिकांनी (Krushnaraj Mahadik) सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोवर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला होता. दरम्यान, रिंकू बरोबर व्हायरल झालेल्या फोटोवर कृष्णराजने अखेर एका मुलाखतीत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
त्या माझ्या चांगल्या मैत्रिण, गैरसमज करुन घेऊ नका : कृष्णराज महाडिक
कृष्णराज महाडिक म्हणाला, माझी सर्वांनी विनंती आहे, माझ्या फोटोमुळे गैरसमज करुन घेऊ नका. त्या माझ्या एक चांगल्या मैत्रिण आहेत. त्या कोल्हापुरात सहज एका कार्यक्रम होता, म्हणून आल्या होत्या. त्या दरम्यान आमची भेट झाली. आम्ही एकत्र महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो होतो. तिथे आम्ही फोटो काढला आणि माझ्या ऑफिस टीमकडून पोस्ट केले गेला. त्याच्यामुळे भरपूर काही अफवा बाहेर पडत आहेत. ज्या चर्चा केल्या जात आहेत, तसं काहीही नाहीये.
त्या फोटोमुळे वेगळा अर्थ काढला जात आहे - महाडिक
पुढे बोलताना कृष्णराज महाडिक म्हणाला, माझ्या कुटुंबात आणि त्यांच्या कुटुंबात देखील अनेक गोष्टी विचारल्या जात आहेत. नेमकं काय चालू आहे? हे विचारत आहेत. परंतु तसं काही नाही, त्यामुळे गैरसमज करुन घेऊ नका. आम्ही ठरवूनच भेटलो होतो. मंदिराच्या दर्शनासाठी देखील एकत्रच गेलो होतो. परंतु त्या फोटोमुळे वेगळा अर्थ काढला जात आहे. याच्याबद्दल मी बोलतोय.
काही दिवसांपूर्वी आमच्या कुटुंबात एक ब्लॉग शूट झाला होता. त्यामध्ये माझ्या वडिलांनी माझ्या लग्नाबाबत भाष्य केलं होतं. त्यामुळे काही लोकांना वाटतं असेल. पण आम्ही चांगले मित्र आहोत. त्याच्या पलिकडे आमच्यामध्ये काहीच नाही. मी पुन्हा एकदा विनंती करतोय की, तसं काही समजून घेऊ नका. माझं कुटुंब एकत्र आल्यानंतर मजा-मस्ती करत असतं, पण साहेब त्या ब्लॉगमध्ये माझ्या लग्नाबाबत बोलतील हे मला देखील अपेक्षित नव्हतं, असंही कृष्णराज महाडिक म्हणाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Video: राहुल सोलापूरकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही; अमितेशकुमार यांनी सांगितलं पुढं काय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
