एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी 5' वर पहिल्या सिझनच्या स्पर्धकाची प्रतिक्रिया, रितेश देशमुखच्या होस्टींगवर काय म्हणाली अभिनेत्री? 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनवर पहिल्या सिजनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. 

Reshim Tipnis on Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) पाचव्या सिझनबाबत कलर्स मराठीकडून घोषणा करण्यात आली आहे. या सिझनमध्ये होस्ट म्हणून महेश मांजरेकर यांच्या जागी अभिनेता रितेश देशमुख दिसणार आहे. या मराठी बिग बॉसच्या सिझनची प्रेक्षक मागील दोन वर्षांपासून वाट पाहत होते. आता तो सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण मराठी बिग बॉसचा पहिला सिझन प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिला. या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली अभिनेत्री रेशम टिपणीस (Reshim Tipnis) हीने नुकतच पाचव्या सिझनबाबत भाष्य केलं आहे. 

रेशम ही लवकरच कलर्स मराठीवरील अंतरपाट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत रेशम महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. त्यानिमित्ताने रेशमने राजश्री मराठीसोबत संवाद साधला. त्यावेळी तिने बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनवर भाष्य केलं आहे. तसेच रेशम हा सिझन पाहण्यासाठी देखील उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय. 

रेशम टीपणीसने काय म्हटलं?

रेशमने बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनबाबत म्हटलं की, 'रितेश या सिझनचं होस्टींग करणार आहे, त्यामुळेही मी या सिझनसाठी देखील खूप उत्साहित आहे. मला खात्री आहे की, रितेश त्याच्या स्टाईलने होस्टींग करेल, तो त्याच्या स्टाईलने दर शनिवारी शाळा घेईल. प्रत्येक सिझनप्रमाणे मी हा सिझनदेखील फॉलो करणार आहे. कारण मी त्या कार्यक्रमाचा भाग असल्याने मला तो कार्यक्रम आवडतो.' 

महाराष्ट्रात पुन्हा घुमणार बिग बॉसचा आवाज

हिंदीमधल्या अफाट यशानंतर 'बिग बॉस' हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला. “बिग बॉस मराठी”चा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचला. प्रेक्षक या कार्यक्रमावर बेहद फिदा झाले. “बिग बॉस मराठी” च्या पहिल्या चार सिझनने मराठी प्रेक्षकांची तुफान मने जिंकली आणि मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सिझनची जोरदार चर्चा झाली. आता त्याच 'बिग बॅास' मराठीच्या नव्या सिझनची जोरात तयारी सुरू झालीय. 

'बिग बॅास'चे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची, कुतूहलाची बाब असते. बिग बॅास मराठीचे हे आलिशान घर आकार घेऊ लागले आहे. तसेच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये 'बिग बॅास'च्या या घरात आणखी काय काय नाविन्य असेल, काय एक्स्ट्रा गॅासिप अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

ही बातमी वाचा : 

Marathi Serial : "आता अरुंधतीचं तिसरं लग्न दाखवणार का?" 'आई कुठे काय करते'च्या नव्या एन्ट्रीवर प्रेक्षकांची नाराजी 

महत्त्वाच्या बातम्या

मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget