(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RD Burman Birthday : स्वत:च्या वडिलांवर केलेला गाण्याची चाल चोरल्याचा आरोप; आर.डी.बर्मन अन् त्यांच्या वडिलांचा मजेशीर किस्सा
आर.डी.बर्मन (RD Burman) यांचे वडील एस.डी.बर्मन हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक होते.
आर.डी. बर्मन जेव्हा नऊ वर्षाचे होते तेव्हा ते वडिलांपासून दूर राहून कोलकाता येथे शिक्षण घेत होते. त्यावेळी एस.डी.बर्मन हे मुंबईमध्ये होते. बालपणापासूनच आर.डी. बर्मन यांना संगीताची आवड होती. त्यामुळे त्यांचे लक्ष शिक्षणामध्ये लागत नव्हते. एकदा आर.डी. बर्मन यांना परीक्षेत कमी गुण मिळाले त्यावेळी एस.डी.बर्मन यांनी कोलकाता येथे जाऊन आर.डी. बर्मन यांना सुनावले. त्यानंतर एस.डी.बर्मन यांनी शिक्षणाबाबत आर.डी. बर्मन यांनी विचारले त्यावेळी त्यांनी सांगितलं की, 'शिक्षण नाही तर संगीतक्षेत्राची मला आवड आहे.' हे ऐकल्यानंतर एस.डी.बर्मन यांनी आर.डी. बर्मन यांना गाण्याची चाल ऐकवायला सांगितली. त्यावेळी आर.डी. बर्मन यांनी एक चाल ऐकवली. ती गाण्याची चाल ऐकल्यानंतर एस.डी.बर्मन हे मुंबईला गेले. त्यानंतर काही दिवसांनी कोलकाता येथील चित्रपटगृहांमध्ये 'फंटूस' चित्रपट रिलीज झाला. आर.डी. बर्मन यांनी जे संगीत एस.डी.बर्मन यांना ऐकवले होते, त्याचाच वापर 'फंटूस' या चित्रपटात करण्यात आला होता. त्यामुळे आर.डी. बर्मन हे आश्चर्यचकित झाले. आर.डी.बर्मन यांनी एस.डी.बर्मन यांच्यावर गाण्याची चाल चोरी केल्याचा आरोप केला. त्यानंतर जे एस.डी.बर्मन यांनी उत्तर दिले, ते ऐकून आर.डी. बर्मन थक्क झाले. एस.डी.बर्मन म्हणाली, की लोकांना ही चाल आवडते की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी या संगीताचा वापर केला.
'भूत बंगला', 'तीसरी मंजिल', 'पडोसन', 'प्यार का मौसम', 'कटी पतंग', 'द ट्रेन', 'हम किसी से कम नहीं', 'सत्ते पे सत्ता', 'शक्ति', 'सागर' या चित्रपटांसाठी आर.डी. बर्मन यांनी संगीत दिलं. त्यांच्या संगीतामधील हटके शैलीला लोकांची पसंती मिळाली.
हेही वाचा :
Pancham Da Songs : 'पंचम दा'अर्थात आरडी बर्मन यांची सर्वकाळ खास 'ही' दहा गाणी