ते म्हणतात तू गेलास, तुझं नुकसान सहन करणं खूप कठीण; रतन टाटांच्या जाण्यानं एक्स गर्लफ्रेंडच्या भावनांचा बांध फुटला
Simi Garewal on Ratan Tata Death: सर्वांसाठी नेहमीच खंबीर असलेले रतन टाटा वैयक्तिक आयुष्यात मात्र एकटेच होते. तब्बल 4 वेळा प्रेमात पडलेले रतन टाटा आयुष्यभर सिंगलच राहिले. आज त्यांच्या जाण्यानं कधीकाळी त्यांनी जिच्यावर जिवापाड प्रेम केलं, त्यांच्या भावनांचाही बांध फुटला.
Simi Garewal on Ratan Tata Death: रतन टाटा (Ratan Tata)... उद्योग विश्वातलं सर्वात विश्वासार्ह्य नाव. देशावर आलेलं कोणतंही संकट असो, मानवनिर्मित किंवा नैसर्गिक नेहमीच मदतीसाठी तप्तर. एखाद्याला मदत करताना किंवा एखाद्या मोठ्या कामासाठी दान करताना रतन टाटांनी नेहमीच सढळ हातानं मदत केली. आपल्या संपूर्ण संपत्तीतील सर्वात मोठा हिस्सा दान करणारे कदाचित रतन टाटा एकमेवच. टाटा (TATA Group) म्हणजे, विश्वास... हे ब्रीदवाक्य भारतातील प्रत्येकाच्या मनात दृढ झालं, त्यात रतन टाटांचं मोलाचं योगदान. आपला साधेपणा, दानशूरपणा यांमुळे रतन टाटा देशातील सर्वात शेवटच्या माणसापर्यंत अगदी सहज पोहोचले. आज त्यांच्या जाण्यानं देशातील प्रत्येकाच्या मनात एक पोकळी निर्माण झाली आहे. आपल्यातलंच कुणीतरी गेलंय, अशी भावना आज देशातील प्रत्येकाची आहे.
सर्वांसाठी नेहमीच खंबीर असलेले रतन टाटा वैयक्तिक आयुष्यात मात्र एकटेच होते. तब्बल 4 वेळा प्रेमात पडलेले रतन टाटा आयुष्यभर सिंगलच राहिले. आज त्यांच्या जाण्यानं कधीकाळी त्यांनी जिच्यावर जिवापाड प्रेम केलं, त्यांच्या भावनांचाही बांध फुटला. रतन टाटांची एक्स गर्लफ्रेंड, जीवलग मैत्रिण आणि अभिनेत्री सिमी गरेवाल या रतन टाटांच्या जाण्यानं भावूक झाल्या आहेत. सिमी गरेवाल याचं एकेकाळी रतन टाटा यांच्यावर जिवापाड प्रेम होतं, तसेच दोघांमध्ये खास मैत्रीदेखील होती. पण वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचा मित्र अचानक त्यांचा निरोप घेईल, हे कुणाला माहीत होतं. आपल्या मित्राच्या जाण्यानं सिमी गरेवाल भावूक झाल्या असून त्यांनी एक ट्वीट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
सिमी गरेवाल यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर रतन टाटा यांच्यासोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. सिमी गरेवाल यांचा प्रसिद्ध शो Rendezvous with Simi Garewal मध्ये रतन टाटांनी हजेरी लावली होती. त्यावेळी रतन टाटांनी या कार्यक्रमात आपल्या आयुष्याबाबत अनेक खुलासे केले होते.
They say you have gone ..
— Simi_Garewal (@Simi_Garewal) October 9, 2024
It's too hard to bear your loss..too hard.. Farewell my friend..#RatanTata pic.twitter.com/FTC4wzkFoV
रतन टाटांची सिमी गरेवाल यांची भावूक पोस्ट...
रतन टाटांसोबतचा फोटो शेअर करत सिमी गरेवाल यांनी एक भावूक पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "ते म्हणतात की तू गेलास... तुझं नुकसान सहन करणं खूप कठीण आहे... खूप कठीण आहे... गुडबाय माझ्या जिवलग मित्रा..."
रतन टाटांवर जीव जडलेला, स्वतः केलेला खुलासा
प्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवाल यांचा रतन टाटांवर जीव जडला होता. त्या जीवापाड प्रेम करायच्या. 2011 मध्ये ETimes ला दिलेल्या मुलाखतीत स्वतः सिमी अग्रवाल यांनी हे मान्य केलं होतं. सिमी गरेवाल यांना रतन टाटा यांच्यासोबतच्या नात्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना अभिनेत्रीनं सांगितलं होतं की, त्यांना काही काळ रतन टाटा यांना डेट केलं होतं. नंतर त्यांचं ब्रेकअप झालं, पण, ते नेहमीच चांगले मित्र राहिले आहेत.
भर मुलाखतीत सिमी गरेवाल यांच्याकडून रतन टाटांवर कौतुकाचा वर्षाव
रतन टाटांचं कौतुक करताना सिमी गरेवाल म्हणाल्या होत्या की, "त्यांचं आणि माझं खूप जुनं नातं आहे. तो परिपूर्ण आहे, आणि त्याचा सेंस ऑफ ह्यूमर कमाल आहे. तो परफेक्ट जेंटलमॅन आहे. त्याच्यासाठी पैसा कधीच महत्त्वाचा नव्हता."
महत्त्वाच्या इतर बातम्या :