Animal First Look : रणबीर कपूरच्या 'Animal' सिनेमाची रिलीज डेट जाहीर; पोस्टर आऊट
Ranbir Kapoor Animal First Look : रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षीत आगामी 'Animal' चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.
Ranbir Kapoor Animal First Look : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) बहुप्रतिक्षीत आगामी सिनेमा 'Animal' चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. याबरोबरच, निर्मात्यांनी या चित्रपटाबाबत एक मोठी घोषणा केली आहे, ती म्हणजे चित्रपटाचा फर्स्ट लूक 31 डिसेंबरला मध्यरात्री प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूरचे चाहते या सिनेमाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत असल्याची माहिती आहे.
रणबीर कपूरशिवाय अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी सारखे स्टार्स 'अॅनिमल'मध्ये दिसणार आहेत. हा क्राईम-ड्रामा चित्रपट आहे, जो पुढच्या वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
'या' दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
या चित्रपटाचे दिग्दर्शन 'कबीर सिंग' फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी केले असून त्यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अॅनिमल हा सिनेमा हिंदीसह पाच भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. 'अॅनिमल'मध्ये रणबीर कपूर एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील रणबीर कपूरची भूमिका ही त्याच्या आतापर्यंतच्या त्याने साकारलेल्या भूमिकेपेक्षा फार वेगळी आहे.
रणबीर कपूरचा अॅनिमल हा सिनेमा टी-सीरीज, मुराद खेतानी, सिने1 स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी यांच्या प्रॉडक्शन हाऊस भद्रकाली पिक्चर्स यांनी संयुक्तपणे तयार केला आहे.
रणवीर कपूरचे चित्रपट
याआधी रणबीर कपूर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसला होता, ज्यामध्ये त्याने सुपरहिरो शिवाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीरबरोबर आलिया भट्टची जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळाली. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. 'अॅनिमल' व्यतिरिक्त रणबीर कपूर लव रंजन दिग्दर्शित 'तू झूठी मैं मकर'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 5 मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :