एक्स्प्लोर

Tunisha Sharma Case : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण; लव्ह जिहादच्या अँगलने होणार तपास, शिझानला एक दिवसाची पोलिस कोठडी

Tunisha Sharma Death Case : तुनिषा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला आज वसई न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Tunisha Sharma Death Case : तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला आज वसई न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पोलीस लव जिहादच्या दृष्टीने तपास करत असल्याचं आजच्या रिमांड रिपोर्टवरुन स्पष्ट झालं आहे. तुनिषाला हिजाब घालण्यासाठी शिझान खानकडून प्रवृत्त केले जात होते. तसेच उर्दु शिकवण्यासाठीही तो तिला सांगायचा. असा जबाब तुनिषाच्या आईने पोलिसांना दिला आहे. त्या दृष्टीने तपासाला आता पुन्हा वेगळं वळण लागणार आहे.   

तुनिषा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला आज वसई न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाला आता लव जिहादचं वळण लागलं आहे. 

वसईतीस वालीव पोलिसांनी कोर्टात शिझानची कोठडी वाढवताना शिजानने तुनिषाला सेटवर कानाखाली मारल्याचं तसेच तो तिला उर्दु शिकवत असल्याचा तसेच तिला हिजाब घालायला सांगत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिझानविरूद्ध हा जबाब कोर्टात नोंदविण्यात आला आहे. तसेच तुनिषाने आत्महत्या करण्याअगोदर काही वेळ शिझानशी बातचीत केली होती. त्यानंतर तो लगेच शूटवर गेला. तुनिषा ही शिझानच्या पाठीमागे शूटच्या गेटपर्यंत गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरुन दिसून आलं आहे. त्यामुळे यांच्यामध्ये यावेळी नेमकं काय बोलणं झालं याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. शिझान खान तपासामध्ये उडवा उडवीची उत्तरं देत असल्याचं वालिव पोलासांनी कोर्टात सांगितलं आहे. 

तर, दुसरीकडे शिझान खानच्या वकिलांनी लव जिहादच्या वळणाला नकार दिला आहे. शिझानची बाजू सांगताना, पोलिसांकडे कोणतेही पुरावे नसल्याचं शिझानच्या वडिलांनी म्हटलं आहे. 

तुनिषाच्या आईने पत्रकार परिषदेत केला आरोप 

तुनिषा शर्माच्या आईने आज आपल्या राहत्या घरी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी तुनिषाने आत्महत्या केली नसून, तिची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. शिजानला शिक्षा व्हावी आपली इच्छा असल्याचं म्हटलं आहे. तुनिषाला हिजाब घालण्यासाठी शिझान खानकडून प्रवृत्त केले जात होते. तसेच उर्दु शिकवण्यासाठीही तो तिला सांगायचा. तिला सेटवर असताना मारहाणही शिझानने केल्याचा गंभीर आरोप तुनिषाच्या आईने आज पत्रकार परिषदेत केला आहे. तुनिषा शिझानवर तसेच त्याच्या घरच्यांवर जास्त पैसे खर्च करायची. शिझानला महागड्या वस्तू गिफ्ट द्यायची. आरोपी शिझानने तिचा फायदा घेतल्याचा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे. मला टॅटू काढणे, कुत्रा पाळणे आवडत नव्हतं. तरीसुध्दा तुनिषाने शिझानसाठी स्वतःच्या शरीरावर love of everything चा टेटु सुद्धा बनवला होता. आणि कुत्रासुध्दा पाळला होता.  तुनिषा ही कधीच डिप्रेशनमध्ये नव्हती. तुनिषा आत्महत्या करणारी मुलगी नव्हती ती निष्पाप मुलगी होती. शिझानने तिचा वापर केल्याचा आरोप करत, शिझान खानला कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी तुनिषाचा आईने केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget