Abhishek Bachchan On Heart Wrenching Incident: 'तुझे पप्पा मरणारेत ना...?', सुपरस्टार वडिलांना शूटिंगवेळी गंभीर दुखापत, इथे फक्त 6 वर्षांच्या चिमुकल्या स्टारकीडला विचारायचे हादरवणारे प्रश्न
Abhishek Bachchan On Heart Wrenching Incident: आम्ही ज्या अभिनेत्याबाबत बोलत आहोत, तो दुसरा-तिसरा कुणी नसून अभिषेक बच्चन आहे. ज्यानं अगदी नकळतण्या वयातच आपल्या डोळ्यांसमोर एक भयानक वास्तव पाहिलं

Abhishek Bachchan On Heart Wrenching Incident: हेडलाईन वाचूनच तुम्हाला प्रश्न पडला असेल की, असं कसं काय कोण कुणाला विचारू शकतं. कसलाही विचार न करता, कुणी एका 6 वर्षांच्या मुलाला त्याच्या वडिलांबाबत कसं काय असं विचारू शकतं... इतक्या लहान वयात, ज्या चिमुकल्याला मृत्यू काय असतो? याची साधी कल्पनाही नव्हती. त्याला फक्त त्याच्या आई-वडिलांसोबत खेळायचं होतं, त्यांच्यासोबत राहायचं होतं... त्याला साधी कल्पनाही नव्हती की, त्याच्या वडिलांना काय झालंय? त्याच्या सुपरस्टार वडिलांना झालेली दुखापत एवढी मोठी होती की, ते हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते. पण, जेव्हा त्याच्या कोवळ्या मनाला त्याची भीषणता कळाली, त्यानंतर इतक्या वर्षानंतरही तो त्या वेदना विसरू शकलेला नाही. आम्ही ज्या अभिनेत्याबाबत बोलत आहोत, तो दुसरा-तिसरा कुणी नसून अभिषेक बच्चन आहे. ज्यानं अगदी नकळतण्या वयातच आपल्या डोळ्यांसमोर एक भयानक वास्तव पाहिलं. त्याचे वडील म्हणजे, बॉलिवूडचे सुपरस्टार. पण, अचानक एका सिनेमाच्या शूटिंगवेळी त्यांना गंभीर दुखापत झाली. एवढी गंभीर की, थेट त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न उद्भवला. ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला होता. आम्ही, ज्या स्टारकीडबाबत बोलत आहोत, त्याचं नाव अभिषेक बच्चन आणि त्याचे वडील बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन.
अभिषेक त्याच्या वडिलांवर रागावलेला...
अभिषेक बच्चनच्या जीवनावर आधारित 'अभिषेक बच्चन: स्टाईल अँड सबस्टन्स' या पुस्तकात त्यानं त्याच्या आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. त्यातल्या काही गोड, तर काही अक्षरशः काळीज पिळवटून टाकणाऱ्या. अभिषेकनं सांगितल्यानुसार, 1982 मध्ये, जेव्हा मी सहा वर्षांचा होतो, तेव्हा माझ्या वडिलांना बंगळुरूमधील आमच्या वेस्ट एंड हॉटेलच्या खोलीत आणण्यात आलं. मी आनंदानं उडी मारली आणि त्यांच्याकडे धावलो, मला त्यांच्या पाठीवर बसून सगळीकडे फिरायचं होतं. मला अजिबातच माहीत नव्हतं की, ते गंभीररित्या जखमी झालेत. त्यावेळी त्यांनी सर्वात पहिल्यांदा आणि शेवटचं स्वतःपासून झटकून दूर केलेलं. मला त्यावेळी त्यांचं वागणं एवढं खटकलेलं की, पुढचे कित्येक दिवस मी त्यांच्यावर नाराज होतो.
"तुझे पप्पा मरणार आहेत ना?", जेव्हा चिमुकल्या अभिषेकला विचारला जायचा असा प्रश्न
लेखक आणि फोटोग्राफर प्रदीप चंद्रा यांच्या पुस्तकात ज्युनियर बच्चनच्या आयुष्यातील अनेक किस्से आहेत. अभिषेकनं त्याच्या वडिलांना खोलीत वेदनेनं कळवळतना पाहिलं, पण त्यावेळी त्याच्या त्या कोवळ्या मनाला त्या घटनेचं भीषण वास्तव उमगलंच नाही. वडील वेदनेनं कळवळत होते आणि अभिषेत त्यांच्यावर नाराज होता. पुढच्याच दिवशी अभिषेक आणि श्वेताला विमानानं मुंबईला पाठवलं. विमानात एकट्यानं प्रवास करण्याची दोघांचीही पहिलीच वेळ होती. त्यानंतर काही वेळातच, अमिताभ बच्चन यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
अभिषेक म्हणाला की, त्याच्या पालकांनी त्याला कधीही हे जाणवू दिलं नाही की, त्याचे वडील किती नाजूक परिस्थितीचा सामना करत होते. जीवन मृत्यूशी ते झुंजत होते. दरम्यान, त्याला घराबाहेर या कठोर वास्तवाचा सामना करावा लागला. अभिषेकच्या म्हणण्यानुसार, एक दिवस शाळेत एका मुलानं त्याला विचारलेलं, "तुझे पप्पा मरणार आहेत ना?" सहा वर्षांच्या अभिषेकला ऐकून खूप धक्का बसलेला. एवढा की, तो जागेवरच बेशुद्ध पडलेला. त्याच रात्री त्याला पहिला अस्थमा अटॅक आलेला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























