Rakhi Sawant On Adil Khan : आधी आरोपांचा भडीमार अन् आता प्रतिक्रिया देताना राखीला शब्दच सुचेनात! आदिल खानच्या लग्नाविषयी बोलताना म्हणाली...
Rakhi Sawant On Adil Khan : राखी सावंतचा Ex Husband आदिल खानने नुकतच लग्न केलं आहे. यावर राखी सावंतची प्रतिक्रिया समोर आलीये.
Rakhi Sawant Reaction on Adil Khan : अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही तिच्या विविध कारनाम्यांमुळे कायमच चर्चेत असते. नुकतीच ती तिच्या लग्नाच्या विषयामुळे चर्चेत होती. आदिल खान (Adil Khan Durrani) आणि राखीच्या नातं सोशल मीडियासह समाजमाध्यमांवरही बरच चर्चेत आलं होतं. त्यानंतर नुकतच आदिलने दुसरं लग्न केल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर सगळ्यांना यावर राखी सावंत काय प्रतिक्रिया देते याची उत्सुकता लागून राहिली होती. यावर आता राखी सावंतची प्रतिक्रिया समोर आली आहे.
आदिल खान आणि सोमी खान यांनी जयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्यांच्या लग्नाविषयी सुरुवातीला त्यांनी मौन बाळगलं होतं. पण आदिलने त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन त्याच्या लग्नाबद्दल घोषणा केली. बिग बॉस सीजन 12 ची स्पर्धक सोमी खान हिच्यासोबत आदिलने लग्नगाठ बांधली आहे.
राखी सावंतने काय म्हटलं?
आदिल आणि सोमी यांच्या नात्याविषयी राखीने इ-टाइम्सशी बोलताना भाष्य केलं आहे. यावेळी तिनं म्हटलं की, आदिलने लग्न केलं आहे हे खरं आहे. त्यांच्याकडे कोर्ट मॅरेज सर्टिफिकेटही आहे. पण मला त्याच्या लग्नाबद्दल काहीच बोलायचं नाही. कारण तो पूनम पांडेप्रमाणे त्याच्या व्हिडीओ रिलीजसाठी पब्लिसिटी स्टंट करत आहे आणि लवकरच त्यामागचं सत्य समोर येईल.
आदिलने केला सोमीसोबतच्या नात्याबाबत खुलासा
आदिल खान दुर्रानीने बिग बॉस 12 फेम सोमी खानसोबतच्या विवाहावर मौन सोडले राखी सावंतचा आधीचा पती असलेल्या आदिलने एका मुलाखतीत म्हटले की, हे त्याचे पहिले लग्न आहे आणि येत्या काही दिवसांत याबाबत सगळ्या गोष्टी लोकांसमोर आणणार असल्याचे आदिलने सांगितले.
कोण आहे सोमी खान?
सोमी खान आणि सबा खान 'बिग बॉस 12' मध्ये स्पर्धक म्हणून दिसले होते. या दोघी बहिणी असून त्या मूळच्या जयपूरच्या आहे. करिअरच्या निमित्ताने सोमी सध्या मुंबईत स्थायिक आहे. तसेच सोमी खानने 'न्याय: द जस्टिस', 'केसरिया बालम' आणि 'हमारा हिंदुस्तान' सारखे शो केले आहेत. दरम्यान सोमी आणि आदिल हे एकमेकांना कसे भेटले, त्यांनी लग्न करण्याचा निर्णय का घेतला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. पण सोमी आणि सबासोबत आदिल अनेक पार्टींज् मध्ये दिसला होता.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
Rakhi Sawant Adil Khan Durrani : हे माझे पहिलंच लग्न, राखीच्या Ex Husband ने मौन सोडले