Rakhi Sawant Adil Khan Durrani : हे माझे पहिलंच लग्न, राखीच्या Ex Husband ने मौन सोडले
Adil Khan Durrani : सध्या आदिलने बिग बॉस 12 मधील स्पर्धक सोमी खानसोबत विवाह केला असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सोमी खानसोबतच्या विवाहावर आदिल खानने मौन सोडले आहे.
![Rakhi Sawant Adil Khan Durrani : हे माझे पहिलंच लग्न, राखीच्या Ex Husband ने मौन सोडले Rakhi Sawant ex-husband Adil Khan Durrani first reaction on marriage with Bigg Boss 12 Somi Khan Adil said its my first wedding Rakhi Sawant Adil Khan Durrani : हे माझे पहिलंच लग्न, राखीच्या Ex Husband ने मौन सोडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/08/cb79259671bea3e04c84a8ab88a9c6521709869089381290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Adil Khan Durrani : ड्रामा क्वीन राखी सावंतचा (Rakhi Sawant) Ex Husband आदिल खान दुर्रानी (Adil Khan) पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यावरून चर्चेत आला आहे. सध्या आदिलने बिग बॉस 12 मधील स्पर्धक सोमी खानसोबत विवाह केला असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाच्या फोटो व्हायरल होत आहेत. आदिलच्या दुसऱ्या लग्नाची बातमी ऐकून राखी सावंतला धक्का लागला आहे. तर, दुसरीकडे आदिलने हे आपलं पहिलेच लग्न असल्याचे म्हटले आहे.
View this post on Instagram
सोमी खानसोबतच्या विवाहावर आदिल खानने सोडले मौन...
आता आदिल खान दुर्रानीने बिग बॉस 12 फेम सोमी खानसोबतच्या विवाहावर मौन सोडले आहे. राखी सावंतचा आधीचा पती असलेल्या आदिलने एका मुलाखतीत म्हटले की, हे त्याचे पहिले लग्न आहे आणि येत्या काही दिवसांत याबाबत सगळ्या गोष्टी लोकांसमोर आणणार असल्याचे आदिलने सांगितले.
हे माझे पहिलेच लग्न
आदिलने सांगितले की, हे माझे पहिलेच लग्न आहे. आम्ही या वेळी बेंगळुरूमध्ये आहोत. आम्ही मुंबईत दाखल होणार आहोत. आम्ही लग्नाबाबत अधिकृत घोषणा करणार आहोत, असेही त्याने म्हटले. आदिल आणि सोमीने 2 मार्च 2024 मध्ये जयपूरमध्ये विवाह केला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
View this post on Instagram
सोमी खान तिची बहीण सबा खानसोबत बिग बॉस 12 मध्ये सहभागी होती. या सीझनमध्ये दीपिका कक्कर सलमान खानच्या शोची विजेती ठरली होती. आदिल खान दुर्रानी यांचे पहिले लग्न राखी सावंतसोबत झाले होते. मात्र, राखीने आदिलवर अनेक आरोप केल्यानंतर गेल्या वर्षी दोघे वेगळे झाले. राखीच्या तक्रारीवर 7 फेब्रुवारी 2023 रोजी आदिलला अटक करण्यात आली.
आदिलच्या आधी राखीचे लग्न रितेशसोबत झाले होते. या दोघांनी बिग बॉस 15 च्या घरात एकत्र प्रवेश केला होता, परंतु शोच्या ग्रँड फिनालेनंतर लगेचच ते वेगळे झाले. फेब्रुवारी 2022 मध्ये राखीने रितेशपासून वेगळे झाल्याबद्दल सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)