एक्स्प्लोर

'वाक्य संपायच्या आधीच होकार...', 'राजा शिवाजी'मध्ये अभिषेक बच्चनचं कास्टिंग कसं झालं? फक्त म्हणाला, 'माझा भाऊ जर...'

Raja Shivaji Casting: त्याच्या कास्टिंगविषयी सांगताना रितेशने अभिषेकने एका शब्दावर दिलेला होकार आणि त्याच्या झालेल्या कास्टिंग विषयी खुलासा केला.

Raja Shivaji Abhishek Bachchan Vidya Balan casting: छत्रपती शिवरायांच्या शौर्यावर आधारित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या चित्रपटाची सध्या मनोरंजनसृष्टीत एकच चर्चा आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. 1 मे रोजी ही फिल्म देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.  100 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा सर्वात मोठा बिग बजेट मराठी चित्रपट मानला जातोय. या चित्रपटातील मराठी व हिंदी कलाकारांच्या कास्टिंगचीही सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. रितेश देशमुख ( Ritesh Deshmukh) राजा शिवछत्रपतींची भूमिका साकारतोय. तर संजय दत्त, अभिषेक बच्चन,विद्या बालनसह जेनेलिया डिसूझा व अनेक मराठी कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. प्रत्येकाच्या कास्टिंगचा अनुभव हा वेगळा आहे. अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा छत्रपती संभाजीराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या कास्टिंगविषयी सांगताना रितेशने अभिषेकने एका शब्दावर दिलेला होकार आणि त्याच्या झालेल्या कास्टिंग विषयी खुलासा केला. (Raja Shivaji Casting)

अभिषेक बच्चनचं कास्टिंग कसं झालं ?( Abhishek Bachchan)

खरंतर रितेश देशमुख आणि  अभिषेक बच्चन यांची मैत्री सगळ्यांनाच माहित आहे . अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलंय. 'राजा शिवाजी' चित्रपट जेव्हा बनवायला घेतला त्यावेळी रितेशने स्वतःहून अभिषेकला सांगितलं होतं. रितेशने सांगितलं "मी अभिषेक यांना म्हणालो, मी एक फिल्म करतोय. त्यात एक रोल आहे. मला तुम्हाला .... ' एवढा म्हणेपर्यंत ते म्हणाले 'डन '. त्यांनी पुढे विचारलं सुद्धा नाही. 'डन' म्हटल्यानंतर पुढे एवढेच होत की माझा भाऊ डिरेक्ट करतोय आणि मी चित्रपट करणार. त्याने काहीही विचारलं नाही 'किती दिवस काय?' तो एवढाच म्हणाला कुठे यायचंय, कधी यायचंय एवढंच सांगा मी तिथे असेन . आणि खरंच त्या व्यक्तीने तारखा शेड्युल झालेलं उलट -सुलट एका शब्दानेही मला सांगितलं नाही. 'मी पाहिजे ? येतो ' असं होतं. " रितेश म्हणाला.

विद्या बालनचे कास्टिंग कसं झालं ? (Vidya Balan)

रितेशने विद्या बालनच्या कास्टिंग विषयीही सांगितलं. तो म्हणाला ' विद्या बालन यांना मी विचारलं की एक रोल आहे. चित्रपटासाठी प्रचंड महत्त्वाचा आहे. तुम्ही हा रोल करणार का ? कारण तो रोल तसा बडी बेगमचा आहे. अवघड रोल आहे. मराठा साम्राज्याच्या विरोधातला रोल आहे तो. हा रोल करणार का ? असं विचारल्यानंतर त्यांनी मलाच विचारलं '  हा रोल कोण चांगला करू शकेल असं तुम्हाला वाटतंय? त्यावर मी म्हणालो ' तुमच्याशिवाय हा रोल कोणी चांगला करेल असं मला वाटत नाही ' विद्या म्हणाल्या 'मी करेन' . असं रितेश ने सांगितलं.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raja Shivaji Movie 🎬 (@therajashivajimovie)

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget