एक्स्प्लोर

Raid 2 Box Office Collection Day 7: 'रेड 2'ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी, वाहून गेले दिग्गजांचे रेकॉर्ड; लवकरच 'छावा'ला पछाडणार?

Raid 2 Box Office Collection Day 7: अजय देवगणच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'रेड 2'नं बॉक्स ऑफिसची शान परत मिळवली आहे. चित्रपट भरपूर कमाई करत आहे. 48 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट 100 कोटींपासून फक्त इंचभर दूर आहे.

Raid 2 Box Office Collection Day 7: 'रेड 2' (Raid 2 Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालतोय. अजय देवगण (Ajay Devgn) आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अभिनीत या क्राईम थ्रिलर चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे. यामुळे, हा चित्रपट कामाच्या दिवशीही प्रचंड कमाई करतोय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 'रेड 2'नं 2025 सालचे तीन चित्रपट वगळता सर्व चित्रपटांना मागे टाकलंय. 'रेड 2'नं रिलीजच्या सातव्या दिवशी किती कोटींची कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात... 

'रेड 2'नं सातव्या दिवशी किती कमावले? 

2018 मध्ये प्रदर्शित झालेला अजय देवगणचा 'रेड' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. सात वर्षांनंतर, अजय देवगणनं पुन्हा एकदा 'रेड 2' द्वारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपटातील दमदार संवाद आणि अ‍ॅक्शन सीन्ससह स्टारकास्टच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. यासोबतच, सुट्टी नसलेल्या दिवशीही प्रेक्षक चित्रपटगृहांकडे 'रेड 2' पाहण्यासाठी आकर्षित होत आहेत. 48 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच त्याचं भांडवलं वसूल केलं. अशातच आता 'रेड 2' निर्मात्यांना बक्कळ नफा कमावून देतोय. यासोबतच, चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर...  

View this post on Instagram
 
A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

  • 'रेड 2'नं पहिल्या दिवशी 19.25 कोटी रुपये कमावले होते.
  • दुसऱ्या दिवशी चित्रपटाचा कलेक्शन 12 कोटी रुपये होता आणि तिसऱ्या दिवशी 18 कोटी रुपये होता.
  • 'रेड 2' ने चौथ्या दिवशी 22 कोटी आणि पाचव्या दिवशी 7.5 कोटी रुपये कमावले.
  • सहाव्या दिवशी, चित्रपटाने पुन्हा 7 कोटी रुपये कमावले.
  • आता सकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'रेड 2'नं किलिजीच्या सातव्या दिवशी 4.50 कोटींची कमाई केली आहे.
  • यासह, 'रेड 2'चं सात दिवसांत एकूण कलेक्शन आता 90.25 कोटी रुपये झालं आहे.

'रेड 2'नं सातव्या दिवशी मोडला 'जाट'चा रेकॉर्ड

'रेड 2' बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 'रेट्रो', 'हिट 3', 'भूतनी' सारख्या नव्या चित्रपटांशी टक्कर आणि 'केसरी 2', 'जाट' या चित्रपटांशी स्पर्धा असूनही, 'रेड 2' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. एका अर्थानं, 'छावा'नंतर 'रेड 2'नं बॉलिवूडची लाज राखली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

'रेड 2'नं आधीच सर्व नव्या चित्रपटांना मागे टाकलं होतं, तर सहाव्या दिवशी 'केसरी 2' आणि सातव्या दिवशी 'रेड 2' ला मागे टाकत 90.25 कोटींचं कलेक्शन करून सनी देओलच्या 'जाट' च्या 27 दिवसांच्या कलेक्शनला (89.28 कोटी) धूळ चारली आहे. यासह, अजय देवगणचा हा चित्रपट छावा, स्काय फोर्स आणि सिकंदरनंतर वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट बनला आहे.

'रेड 2'चं लक्ष्य आता 'अलेक्झांडर' आणि 'स्काय फोर्स'वर

'रेड 2' बॉक्स ऑफिसवर ज्या वेगानं पुढे जातोय, ते पाहता 'छावा' नंतर हा चित्रपट या वर्षातील दुसरा सर्वात मोठा चित्रपट ठरणार, यात काही शंकाच नाही. रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात तो 100 कोटींहून अधिक कमाई करेल आणि त्यानंतर तो सिकंदर आणि स्काय फोर्सच्या लाईफटाईम कलेक्शनलाही मागे टाकेल, अशी शक्यता आहे. सध्या सर्वांच्या नजरा बॉक्स ऑफिसवर खिळल्या आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rakhi Sawant Warns Abhinav Kashyap: 'तू जिथे भेटशील टकल्या, चप्पलनं मारणार...'; राखी सावंतनं सलमान खानवर आरोप करणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकाला झोड झोड झोडलं
'तू जिथे भेटशील टकल्या, चप्पलनं मारणार...'; राखी सावंतनं सलमान खानवर आरोप करणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकाला झोड झोड झोडलं
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
Share Market : शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
Nilesh Sable In Vahinisaheb Superstar Show: डॉ. निलेश साबळे नव्या अंदाजात, नव्या रुपात;  महाराष्ट्रातल्या वहिनींसाठी घेऊन येतायत नवाकोरा शो, नाव माहितीय?
डॉ. निलेश साबळे नव्या अंदाजात, नव्या रुपात; महाराष्ट्रातल्या वहिनींसाठी घेऊन येतायत नवाकोरा शो, नाव माहितीय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Morcha : आम्ही कर्जमुक्ती मागायला तुमच्या घरी येतोय, Bacchu Kadu यांचा सरकारला थेट इशारा
Eknath Khadse house Theft : एकनाथ खडसेंच्या घरी चोरी, जळगावात मोठी खळबळ
Vasantdada Sugar Institute : VSI ला दिलेलं अनुदान मूल उद्देशाप्रमाणं होतं का तपासण्याचे आदेश
Heena Gavit Join BJP : स्थानिक निवडणुकांसाठी हिना गावित यांची घरवापसी?
Chandrakhan Khaire : ठाकरे गटाच्या बैठकीत राडा, खैरेंनीच कार्यकर्त्यांना झापलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rakhi Sawant Warns Abhinav Kashyap: 'तू जिथे भेटशील टकल्या, चप्पलनं मारणार...'; राखी सावंतनं सलमान खानवर आरोप करणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकाला झोड झोड झोडलं
'तू जिथे भेटशील टकल्या, चप्पलनं मारणार...'; राखी सावंतनं सलमान खानवर आरोप करणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकाला झोड झोड झोडलं
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
Share Market : शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
Nilesh Sable In Vahinisaheb Superstar Show: डॉ. निलेश साबळे नव्या अंदाजात, नव्या रुपात;  महाराष्ट्रातल्या वहिनींसाठी घेऊन येतायत नवाकोरा शो, नाव माहितीय?
डॉ. निलेश साबळे नव्या अंदाजात, नव्या रुपात; महाराष्ट्रातल्या वहिनींसाठी घेऊन येतायत नवाकोरा शो, नाव माहितीय?
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
Bollywood Actor Struggle Life Story: वडील 'सुपरस्टार', 500 फिल्म्स केल्या, पण मुलगा ठरला 'सुपरफ्लॉप'; चार फिल्म्सनंतरच इंडस्ट्रीला म्हणाला टाटा-बाय बाय...
वडील 'सुपरस्टार', 500 फिल्म्स केल्या, पण मुलगा ठरला 'सुपरफ्लॉप'; चार फिल्म्सनंतरच इंडस्ट्रीला म्हणाला टाटा-बाय बाय...
IND-W vs AUS-W : टीम इंडियाला मोठा दिलासा, प्रतिका रावलच्या जागी शफाली वर्माला संधी, ICC कडून मंजुरी 
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात आक्रमक शफाली वर्माची एंट्री, दुखापतग्रस्त प्रतिका रावलच्या जागी संधी
Mumbai Pune Mumbai 4: 15 वर्षांनंतर पुन्हा घडणार 'मुंबई-पुणे-मुंबई' प्रवास; चौथ्या भागाची घोषणा, गौरी-गौतमची लव्हवाली केमिस्ट्री पाहण्याची उत्सुकता
गौरी-गौतमची लव्हवाली केमिस्ट्री, 'मुंबई-पुणे-मुंबई 4'ची घोषणा; पाहा VIDEO
Embed widget