Pushpa 2 Box Office Day 1 Collection : अल्लू अर्जुनच्या स्टारडमची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी; सकाळी 8 वाजेपर्यंत 21 कोटींची कमाई
Pushpa 2 Box Office Day 1 Collection : पुष्पानं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये बाजी मारलीच होती. पण, आता पुष्पाचं पहिल्या दिवशीचं काही तासांचं फर्स्ट डे कलेक्शन समोर आलं आहे.
Pushpa 2 Box Office Day 1 Collection : अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) स्टारर 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2: The Rule) आज जगभरात प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर (Box Office) त्सुनामी आली. सगळीकडे फक्त पुष्पा, पुष्पा आणि पुष्पाच... सोशल मीडिया म्हणून नका की, थिएटर म्हणू नका, चाहत्यांच्या मनी ध्यानी फक्त पुष्पाच असल्याचं पाहायला मिळत आहे. आता 'पुष्पा 2: द रुल'च्या कलेक्शनबाबत एक रंजक माहिती समोर आली आहे. पुष्पानं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये बाजी मारलीच होती. पण, आता पुष्पाचं पहिल्या दिवशीचं काही तासांचं फर्स्ट डे कलेक्शन समोर आलं आहे. चित्रपटानं रिलीज होताच, अवघ्या काही तासांतच तब्बल 21 कोटींची कमाई केली आहे. ही कमाई सकाळी 8 वाजेपर्यंतचीच आहे.
'पुष्पा 2: द रुल'नं प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धमाका केल्याचं कळतंय. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, हा चित्रपट पहिल्याच दिवशी सुमारे 250 कोटी रुपये कमावणार आहे. असं झाल्यास पुष्पा 2 अगदी सहज आरआरआरचा विक्रम मोडीत काढणार आहे. जर या चित्रपटानं आरआरआरचा विक्रम मोडीत काढला, तर चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठी ओपनर फिल्म ठरणार आहे.
8 वाजेपर्यंतचं कलेक्शन किती?
पहिल्या दिवसाचा पहिला शो संपताच चित्रपटाचं कलेक्शन समोर आलं आहे. असं कदाचित पहिल्यांदाच होत आहे की, पहिल्या दिवसाची फक्त काही तासांच्याच कमाईची आकडेवारी समोर आली आहे. सॅकनिल्कनं पुष्पा 2 संदर्भात एक माहिती शेअर केली आहे, जी अत्यंत आश्चर्यकारक आहे. 5 डिसेंबरला जगभरात चित्रपट रिलीज झाल्यानंतर फक्त सकाळी 8 वाजेपर्यंत पुष्पा 2 नं बॉक्स ऑफिसवर 21.04 कोटी रुपयांची कमाई केल्याचं कळतंय. हा आकडा खूप मोठा आहे आणि आजचा दिवस संपेपर्यंत चित्रपट नक्कीच रेकॉर्डब्रेक कमाई करेल, असा विश्वासही अनेकांकडून व्यक्त केला जात आहे.
अॅडव्हान्स बुकिंग
ओवरसीज प्री-सेल्स असो की, देशांतर्गत विक्री, या चित्रपटानं कमाल केली आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या संदर्भात समोर आलेल्या माहितीनुसार, या चित्रपटानं जवळपास 100 कोटी रुपयांचा गल्ला फक्त अॅडव्हान्स बुकिंगमधून केला आहे. हा आकडा असा आहे की, तो गाठण्यासाठी अनेक चित्रपट कित्येक आठवड्यांची वाट पाहत असतात. पण पुष्पानं हा आकडा केवळ अॅडव्हान्स बुकिंगमध्येच गाठला आहे. आता पुष्पा 2 किती रेकॉर्ड ब्रेक करणार? आणि किती कोटींचा गल्ला करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :