Pushpa 2: अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2: द रुल' बॉक्स ऑफिसवर इतिहास रचण्यासाठी तयार; आधीच्या ब्लॉकबस्टर मूव्हीजचा रेकॉर्ड मोडणार?
Pushpa 2 Box Office Collection: अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे.
Pushpa 2 Box Office Collection: आज 'पुष्पा 2' (Pushpa 2) जगभरात प्रदर्शित झाला. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत होते. अशातच हा चित्रपट बॉक्स ऑफिस नक्की गाजवणार, अशी अपेक्षा अनेक चित्रपट समिक्षकांनी व्यक्ती केली आहे. सगळीकडेच या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आणि चाहत्यांची झुंबड उडाली. अॅडव्हान्स बुकिंगपासूनच पुष्पा 2 नं बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला आहे. अशातच पुष्पा 2 नं फक्त अॅडव्हान्स बुकिंगमधून पहिल्या दिवशी 50 कोटी रुपयांचा गल्ला केला. आज चित्रपट रिलीज झाला असून पहिल्या दिवशी आता कितींचा गल्ला करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशा चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन 'पुष्पा 2: द रुल' नक्कीच ब्रेक करेल, असं बोललं जात आहे.
आरआरआर (RRR)
एसएस राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटात आलिया भट्ट, राम चरण आणि जुनियर एनटीआरसोबत महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली होती. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 200 कोटींचा टप्पा पार केला होता. RRR नं पहिल्या दिवशी जगभरात 233 कोटींची कमाई केली होती.
बाहुबली 2 (Bahubali 2)
प्रभासचा बाहुबली 2 हा चित्रपट प्रचंड हिट ठरला. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 217 कोटींचा गल्ला जमवून बॉक्स ऑफिसला हादरवलं होतं.
कल्कि 2898 एडी (Kalki 2898 AD)
प्रभासचा कल्की 2898 एडी यावर्षी रिलीज झाला. या चित्रपटात प्रभाससोबत अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटानंही उत्तम कलेक्शन केलं होतं. कल्की 2898 एडीनं पहिल्याच दिवशी जगभरात 175 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
KGF चॅप्टर 2
यशच्या KGF चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट ठरला. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचा दुसरा भाग आणला. या चित्रपटाचा दुसरा भागही प्रेक्षकांना आवडला. KGF Chapter 2 नं पहिल्या दिवशी 159 कोटींची कमाई केली होती.
जवान
शाहरुख खानच्या जवाननंही सर्वांची मनं जिंकली. किंग खान नेहमीच चाहत्यांना इंम्प्रेस करतो. त्यानं जवानसोबतही असंच काहीसं केलं होतं. त्याच्या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 129 कोटींची कमाई केली होती.
दरम्यान, आता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' यापैकी किती चित्रपटांचे रेकॉर्ड तोडण्यात यशस्वी ठरतो हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :