'या' 3 दिग्गजांनी नाकारल्यानंतर अल्लू अर्जुन, रश्मिकाच्या पदरात पडलं सुपरडुपर हिट 'पुष्पा'चं दान; नकार देणारे 'ते' तिघे कोण?
Pushpa 2: The Rule Release Today: 'पुष्पा: द रुल' या चित्रपटासाठी अल्लू अर्जुन, रश्मिका आणि फहाद फासिल यांना पहिली पसंती नव्हतीच. दिग्दर्शक सुकुमार यांनी सुरुवातीला तीन मोठ्या कलाकारांचे दरवाजे ठोठावले होते, पण तिघांनीही स्पष्ट नकार दिला.
Pushpa 2: The Rule Release Today: अल्लू अर्जुन (Allu Arjun), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि फहद फासिल (Fahadh Faasil) स्टारर 'पुष्पा 2 : द रूल' (Pushpa 2: The Rule) आज 5 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.मात्र, रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुन, रश्मिका आणि फहद 'पुष्पा'साठी पहिली पसंती कधीच नव्हती. दिग्दर्शक सुकुमार (Sukumar) यांच्या सुपरडुपर हिट चित्रपटासाठी त्यांची पसंती या स्टार्स ऐवजी वेगळ्याच तिघांना होती. सुकुमार यांना या तिघांऐवजी दुसऱ्याच कुणाला तरी घ्यायचं होतं, पण त्यांनी ठरवल्याप्रमाणे काही गोष्टी जुळून आल्या नाहीत. पण नेमकं त्यावेळी घडलं काय जाणून घेऊयात सविस्तर...
'मनी कंट्रोल'च्या रिपोर्ट्सनुसार, बॉक्स ऑफिस गाजवलेल्या पुष्पासाठी दिग्दर्शक सुकुमार यांची पहिली पसंती अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फासिल कधी नव्हतेच. त्यांची पसंती वेगळ्याच तिघांना होती. त्यांना पुष्पा राजच्या भूमिकेसाठी मेहश बाबूला कास्ट करायचं होतं. मात्र, महेश बाबूनं चित्रपटासाठी थेट नकार कळवला. त्यावेळी महेश बाबूच्या नकाराचं असं कारण समोर आलेलं की, स्वत:मध्ये एवढा मोठा बदल करून ग्रे शेड असलेली व्यक्तिरेखा साकारण्यात महेश बाबूला संकोच वाटत होता. यानंतर अल्लू अर्जुनला या भूमिकेसाठी संपर्क करण्यात आला आणि त्यानंतर जो पुष्पा आपण सर्वांनी पडद्यावर पाहिला, त्यानं फिल्म इंडस्ट्रीत चक्क इतिहास घडवला.
View this post on Instagram
श्रीवल्लीच्या भूमिकेसाठी रश्मिका नाहीतर, समंथा होती चॉईस
अल्लू अर्जुननं या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला आणि हा सन्मान मिळवणारा तो पहिला तेलगू अभिनेता ठरला. पण, तुम्हाला माहीत आहे का? श्रीवल्लीच्या भूमिकेसाठी सुकुमार यांनी समंथाला विचारलं होतं. तसं पाहायला गेलं तर, समंथा रुथ प्रभू पुष्पाच्या पहिल्या पार्टमधल्या एका आयटम सॉन्गमध्ये झळकली होती. तिच्या ऊ अंतवा गाण्यावर फक्त देशच नाहीतर अख्खं जग थिरकलं. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथाला यापूर्वी चित्रपटात श्रीवल्लीच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. पण, समंथानं नाकारली. कारण समंथाला 'रंगस्थलम' नंतर पडद्यावर ग्रामीण मुलीची भूमिका करायची नव्हती म्हणून तिनं श्रीवल्लीची भूमिका नाकारली. समंथानं नाकारल्यानंतर श्रीवल्लीसाठी रश्मिकाला फायनल करण्यात आलं. दरम्यान, समंथाचा 'रंगस्थलम' हा चित्रपट सुकुमार यांनीच दिग्दर्शित केला होता.
फहाद फासिल ऐवजी पुष्पासाठी 'या' दिग्गज अभिनेत्याला विचारलेलं
सुकुमार यांनी फहद फासिलच्या आधी विजय सेतुपती यांना चित्रपटातील खलनायक एसपी भंवर सिंह शेखावतची भूमिका ऑफर केली होती. मात्र, सेतुपतीच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अभिनेता विजयला सुकुमारच्या चित्रपटासाठी वेळ मिळू शकला नाही आणि त्यामुळे त्या भूमिकेसाठी फहाद फासिलची वर्णी लागली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :