Pushkar Jog: 'पुन्हा भारतात तोंड दाखवू नकोस...', पुष्कर जोग आता UAE चा अधिकृत रहिवासी, व्हिसा मिळाल्याचं शेअर करताच चाहते भडकले
गेल्या काही वर्षांत अनेक भारतीय कलाकार आणि उद्योजकांना यूएईचा गोल्डन व्हिसा देण्यात आला आहे. हा व्हिसा एक प्रतिष्ठेचं प्रतीक मानला जातो.दीर्घकाळ तिथे राहण्याची आणि काम करण्याची मुभा मिळते.

Pushkar Jog: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पुष्करने यावेळी एका खास कारणामुळे लक्ष वेधलं आहे. त्याला संयुक्त अरब अमीरातचा (UAE) गोल्डन व्हिसा मिळाल्याचं त्याने स्वतः सोशल मीडियावर जाहीर केलं आहे. (Entertainment News)
पुष्करने नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं, “शेवटी माझा गोल्डन व्हिसा मिळाला. आता मी अधिकृतपणे यूएईचा रहिवासी आहे. हे सगळं मी माझ्या मुलीसाठी केलं आहे. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी, तिच्या सुरक्षिततेसाठी आणि तिच्या आनंदासाठी.” त्याने या पोस्टसोबत काही फोटोदेखील शेअर केले आहेत. पुष्करने ही माहिती शेअर करताच त्याच्या अनेक चात्यांनी नाराजी व्यक्त केली असून अनेकांनी त्याला ट्रोल केलंय.गेल्या काही वर्षांत अनेक भारतीय कलाकार आणि उद्योजकांना यूएईचा गोल्डन व्हिसा देण्यात आला आहे. हा व्हिसा एक प्रतिष्ठेचं प्रतीक मानला जातो आणि त्याद्वारे धारकाला दीर्घकाळ तिथे राहण्याची आणि काम करण्याची मुभा मिळते.
चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया, अनेकांनी केलं ट्रोल
पुष्करच्या या आनंदवार्तेनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.काही चाहत्यांनी त्याचं मनापासून अभिनंदन केलं आणि म्हटलं, “तू मेहनतीने जे मिळवलं आहेस, त्याचा आम्हाला अभिमान आहे.” तर काहींनी त्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. काही नेटिझन्सनी प्रश्न उपस्थित केला की, “इथे पैसे कमवून , इथे मोठे होऊन, बाहेरच्या देशाचे कसे नागरिकत्व मिळवले हे सांगण्यात काय महान कामगिरी केलीय? मी तर म्हणते तुमच्या सारख्या लोकांना इथे परत कुणी कामच देऊ नये,तिथेच काही मिळतंय का बघा काम.आणि all for my daughter म्हणताय, शेवटी मुस्लिम कंट्री आहे ती तिथे मुलगी सुरक्षित असणार आहे हिंदू राष्ट्रापेक्षा? खरच तुमच्या या असल्या विचारसरणीचे कौतुक करावे का कीव करावी हेच कळत नाही.पुन्हा भारतात तोंड दाखवले नाहीत तर बरे होईल.”
'मिळालेली प्रसिद्धी भारतानं दिली' चाहते म्हणाले...
" मी तुमच्या पहिल्याच मराठी चित्रपटापासून तुमचा फॅन आहे. मीसुद्धा जोग क्लासेसमध्येच शिकलो आहे. मला तुमच्या यूएई रेसिडेन्सीबद्दल काही आक्षेप नाही, पण तुम्ही इथल्या लोकांकडून मिळवलेली प्रसिद्धी, फॉलोअर्स आणि पैसा हे सगळं या मातीतल्या लोकांमुळेच मिळालं आहे. आणि आता तुम्ही “कॅटल क्लास” मागे सोडून परदेशात जाण्याचा अभिमान बाळगत आहात. लक्षात ठेवा, तुमची ओळख नेहमी या भूमीने आणि इथल्या लोकांनी दिलेल्या प्रेमामुळेच राहणार आहे. हीच माती उद्या तुमच्यापेक्षाही चांगले कलाकार घडवेल." असं एका चाहत्याने लिहिलं.
पुष्कर जोग मराठी सिनेसृष्टीतला एक मेहनती आणि बहुगुणी कलाकार म्हणून ओळखला जातो. ‘साठेचं घर उघडलेलं’, ‘सुन माझी सावित्री’, ‘वेलकम होम’ आणि ‘झोका’सारख्या चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. शिवाय ‘बिग बॉस मराठी’मधील त्याच्या सहभागानंतर त्याची लोकप्रियता आणखी वाढली. सध्या तो त्याच्या नव्या प्रोजेक्ट्स आणि डिजिटल कंटेंटमुळे सतत चर्चेत असतो. एकूणच, पुष्कर जोगच्या या निर्णयावर सोशल मीडियावर मतमतांतरे उमटली असली तरी त्याने घेतलेलं हे पाऊल त्याच्या कुटुंबाच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे.























