एक्स्प्लोर

Snehal Tarde : 'स्वतःला हिंदू म्हणताना खंत वाटायची पण आता...', प्रवीण तरडेंच्या पत्नीने पूर्ण केला 'वेदांचा अभ्यास', शेअर केली खास पोस्ट 

Snehal Tarde :  प्रविण तरडे यांच्या पत्नीने वेदांचा अभ्यास करत त्यामध्ये पदवी संपादन केली आहे. त्याविषयी तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

Snehal Tarde :  प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे (Pravin Tarde) यांची पत्नी स्नेहल तरडे (Snehal Tarde) देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्री या कायमच त्यांच्या विविध गोष्टींमुळे कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट, कधी त्यांचं वैयक्तिक आयुष्य तर कधी त्यांच्या आयुष्यामुळे चर्चेत येत असतात. पण स्नेहल सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. शिक्षणाला वय नसतं, असं म्हणतात ते योग्यच आहे, हे सिद्ध करत स्नेहलने थेट वेदांचा अभ्यास पूर्ण केला आहे. 

प्रविण तरडे यांच्या महाराजांच्या सिनेमातील भूमिका असोत किंवा त्यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार असतो, प्रत्येक कारणांमुळे ते कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यातच आता त्यांच्या पत्नीने वेदांचा अभ्यास पूर्ण केला असल्याची माहिती तिच्या सोशल मीडियावरुन दिली. हिंदु धर्मात वेद, शास्त्र, पुराणं यांना विशेष महत्त्व आहे. त्याच वेदांचा अभ्यास पूर्ण केला आहे. याविषयी सोनलने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

स्नेहलची पोस्ट नेमकी काय?

स्नेहलने तिच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हटलं की, वेदांचा अभ्यास', स्वतःला हिंदू म्हणताना, आपल्या धर्माला सर्वश्रेष्ठ मानताना तो धर्म ज्या चार वेदांवर आधारीत आहे त्या वेदांचा मी योग्य पद्धतीने अभ्यास केलेला नाही याची खंत मला अनेक दिवस सतावत होती. पुण्यातील भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टम या संस्थेतर्फे Study of Vedas या अभ्यासक्रमात 78 टक्के मिळवून आज ती खंत मी दूर केली. भारतातील अनेक मान्यवर गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे या विषयात आता आणखी खोलवर जाण्याची प्रेरणा मला मिळाली आहे, आशीर्वाद असावा. 

स्नेहलच्या या पोस्टवर अनेकांनी तिचं अभिनंदन करत कौतुक केलं आहे. स्नेहलही अनेक सिनेमा आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अनेक सिनेमातील तिच्या भूमिकांनी विशेष लक्ष देखील वेधून घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यातच आता तिच्या या अभ्यासामुळेही ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असल्याचं पाहायला मिळतंय.  

View this post on Instagram
 
A post shared by Snehal Tarde (@snehprat1311)

ही बातमी वाचा : 

Ritesh Deshmukh : 'राजकारणात 2 अधिक 2 बरोबर 4 असं कधीच नसतं', रितेशने उलगडलं विलासरावांच्या राजकीय गणिताचं कोडं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Sharma : T 20 विश्वचषकातून निवृत्तीवेळी रोहित शर्माने सांगितल्या आठवणीTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 June 2024 : ABP MajhaAmravati T 20 World Cup Celebration : T 20 विश्वचषक विजयाचा अमरावतीत जल्लोषABP Majha Headlines :  8:00AM : 30 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
Hardik Pandya: त्या एका गोष्टीमुळे व्हिलन ठरेलला हार्दिक पांड्या अखेरच्या षटकात हिरो ठरला, भरमैदानात रोहित शर्माने कुंफू पांड्याचा गालगुच्चा घेतला
त्या एका गोष्टीमुळे व्हिलन ठरेलला हार्दिक पांड्या अखेरच्या षटकात हिरो ठरला, भरमैदानात रोहित शर्माने कुंफू पांड्याचा गालगुच्चा घेतला
Hardik Pandya: भारत जिंकला अन् हार्दिकच्या डोळ्याला पाण्याची धार, मनात साचलेलं शल्य मोकळं केलं, म्हणाला, गेले सहा महिने....
भारत जिंकला अन् हार्दिकच्या डोळ्याला पाण्याची धार, मनात साचलेलं शल्य मोकळं केलं, म्हणाला, गेले सहा महिने....
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
Embed widget