Ritesh Deshmukh : 'राजकारणात 2 अधिक 2 बरोबर 4 असं कधीच नसतं', रितेशने उलगडलं विलासरावांच्या राजकीय गणिताचं कोडं
Ritesh Deshmukh : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवगंत नेते विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुख याने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
Ritesh Deshmukh : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवगंत नेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) याने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी संपूर्ण देशमुख कुटुंबाने विलासरावांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली देखील वाहिली. रितेशने त्याच्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत त्याला हॅप्पी बर्थडे पप्पा असं कॅप्शन दिलं आहे. रितेशने त्याच्या सोशल मीडियावर विलासराव देशमुख यांचा आणखी एक फोटो शेअर केला आहे.
रितेशन त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो ठेवलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात विलासराव देशमुखांची कारकिर्द ही फार मोठी आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी राज्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पण 26/11 ला मुंबईवर आतंकवादी हल्ला झाला आणि विलासराव देशमुखांना त्यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी लागली. वडिलांविषयी बोलताना रितेश प्रत्येकवेळी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देखील रितेशने भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
रितेशची पोस्ट नेमकी काय?
महाराष्ट्राच्या राजकारणाती दिग्गज नेत्यांच्या यादीमध्ये विलासराव देशमुखांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. त्यांची मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीचा देखील महाराष्ट्राच्या राजकारणात आजही तितक्याच आदराने उल्लेख केला होता. राजकारणातील या बड्या नेत्याची 2012 मध्ये प्राणज्योत मालवली. आज त्यांची 79वी जयंती आहे. त्यानिमित्ताने रितेशने एक पोस्ट शेअर केली. त्याने विलासराव देशमुख यांचा फोटो शेअर करत, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारं त्यांचं एक वाक्य लिहिलं आहे. त्यावर त्याने लिहिलं आहे की, राजकारणात 2 आणि 2 बरोबर 4 असं गणित कधीच नसतं, ते कधी 3 असतं किंवा 5 असतं पण 4 कधीच नसतं. विलासराव देशमुख यांचं राजकारणाविषयी या वक्तव्याचा आजच्या राज्यकर्त्यांकडूनही उल्लेख केला जातो.
वडिलांचं ते वाक्य मला नेहमीच प्रेरणा देतं - रितेश देशमुख
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आपल्या स्पष्टवक्तेपणामुळं प्रसिद्ध होते. त्यांच्या हजरजबाबीपणा देखील अनेकवेळा अनुभवायला मिळायचा. त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुखनं देखील त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची काही उदाहरणं सांगितली आहेत. माझा कट्ट्यावर रितेशने याविषयी भाष्य केलं होतं. रितेशने म्हटलं होतं की, 'ज्यावेळी मला चित्रपटाची ऑफर मिळाली होती, त्यावेळी मी बाबांना (विलासराव देशमुख) ही गोष्ट सांगण्यासाठी आलो. त्यावेळी मला त्यांनी सांगितलेलं एक वाक्य आजही लक्षात आहे. ते मला म्हणाले की, तू तुझ्या नावाची काळजी घे मी माझ्या नावाची काळजी घेईल. त्यांचं हे वाक्य मला नेहमी प्रेरणा देतं. तुम्हाला जे आयुष्यात करायचं आहे त्याची जबाबदारी आपणच घ्यायला हवी.'
View this post on Instagram