Crew First Look poster: बॉक्स ऑफीसवर बॉलीवूडच्या तारका दाखवणार झलवा, करिना कपूर,तब्बू आणि क्रिती सेनॉनच्या 'द क्रू'मधील लूकने वेधलं लक्ष
Crew First Look poster: करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन या एअर होस्टेसच्या लूकमध्ये असलेल्या 'द क्रू' या चित्रपटातील त्यांच्या लूकचे पोस्टर सध्या समोर आले आहे.
Crew First Look poster: करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि तब्बू (Tabbu) यांची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित 'द क्रू' (The Crew) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतच या सिनेमातील या तिन्ही अभिनेत्रींचे लूक समोर आले आहेत. या तिघींच्या एअरहॉस्टेसच्या लूकवर सध्या चाहते देखील भलतेच फिदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.द क्रू हा सिनेमा 29 मार्च रोजी चित्रपटगृहांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या टीझरलाही प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली.
नुकतच या अभिनेत्रींच्या या नव्या लूकवर चाहतेही फिदा झालेत. रेड कलरच्या एअरहॉस्टेसच्या ड्रेसमध्ये या तिघीही अगदी उठून दिसत आहेत. करीना कपूर खान, क्रिती सेनॉन आणि तब्बू या तिघींनी त्यांचा हा लूक त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. राजेश राजेश ए कृष्णन यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तसेच अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूर आणि एकता कपूर या दोघींनी या चित्रपटाची निर्मिती केलीये. या तिघींनी हे फोटो शेअर करत रेडी टू चेक - इन? टाइम टू फ्लाय असं कॅप्शन दिलं आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
अशी आहे सिनेमाची गोष्ट
या सिनेमाची गोष्ट एअर हॉस्टेसच्या आयुष्यावर आधारित आहे. या तिघींच्या आयुष्यात एअर हॉस्टेस म्हणून त्यांच्या आयुष्यातील त्रास आणि अडचणी मांडण्यात आल्या आहेत. या तिघांनाही त्यांच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि वेगळं करायचं आहे पण ते पुन्हा पुन्हा त्याच परिस्थितीत येतात जिथून ते पळत असतात. दरम्यान या सिनेमाची एक कॉमेडी बाजू देखील आहे. या चित्रपटात दिलजीत दोसांझही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :