Pranit More Health Update: डेंग्यूमुळे प्रणीत मोरे घराबाहेर, पण लवकरच 'बिग बॉस 19'मध्ये वापसी? कॉमेडियनच्या टीमकडून हेल्थ अपडेट शेअर
Pranit More Health Update: प्रणीत मोरेला 'बिग बॉस सीजन 19'मधून बाहेर काढण्यात आलेलं नाही. डेंग्यूमुळे त्याला वैद्यकीय मदतीसाठी बाहेर पाठवण्यात आलं होतं.

Pranit More Health Update: 'बिग बॉस 19'चं (Bigg Boss 19) आतापर्यंतचं सर्वात शॉकिंग एलिमिनेशन म्हणजे, महाराष्ट्राचा आणि आता संपूर्ण देशाचा लाडका सुप्रसिद्ध कॉमेडियन प्रणीत मोरे (Pranit More). गेल्या आठवड्यात, बसीर आणि नेहल घराबाहेर गेल्यानंतर, या आठवड्यात प्रणीत मोरे घराबाहेर गेला. खरंतर आजारी पडल्यामुळे आणि योग्य वेळी उपचार घ्यावे लागणार असल्यामुळे प्रणीत मोरे घराबाहेर आला. प्रणीत मोरेला डेंग्यू झाल्यानं त्याला खेळ पुढे नेता आला नाही. संपूर्ण देशभरातील लोकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान मिळवणारा प्रणीत मोरे घराबाहेर जात असल्याची घोषणा सलमान खाननं (Salman Khan) केली आणि बिग बॉस फॅन्सच्या डोळ्यांत अश्रू तराळले. पण, आता प्रणीत मोरेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रणीत मोरे आता बरा होऊन लवकरच घरात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.
प्रणीत मोरेला 'बिग बॉस सीजन 19'मधून बाहेर काढण्यात आलेलं नाही. डेंग्यूमुळे त्याला वैद्यकीय मदतीसाठी बाहेर पाठवण्यात आलं होतं. जसा प्रणीत घराबाहेर पडला, तसा त्याच्या टीमनं त्याची हेल्थ अपडेट शेअर करणारं एक निवेदन जारी केलं. ज्यामुळे चाहत्यांना दिसाला मिळाला आहे. प्रणीत मोरे लवकरच बरा होईल आणि शोमध्ये परत येईल, अशी आशा व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
खरं तर, सलमान खाननं 'वीकेंड का वार' भागात सांगितलं की, डॉक्टरांनी प्रणीतचे मेडिकल रिपोर्ट दिले आहेत आणि दुर्दैवानं, त्याला मेडिकल ट्रिटमेंटसाठी घर सोडावं लागेल. आणि तो जात असल्यानं, इतर सर्वजण सुरक्षित आहेत. कोणालाही बाहेर काढण्यात येणार नाही. स्टँड-अप कॉमेडियनच्या जाण्यानं घरातले त्याचे मित्र खूपच निराश झाले आहेत आणि ते त्याला बरा होऊन लवकर परत येण्याची विनंती सातत्यानं कॅमेऱ्यासमोर करताना दिसत आहेत.
प्रणीत मोरेच्या टीमनं शेअर केली हेल्थ अपडेट
प्रणीत मोरेच्या टीमनं त्याची काळजी करणाऱ्या त्याच्या चाहत्यांची चिंता कमी करण्यासाठी हेल्थ अपडेट जारी केलं. त्यात प्रणितची प्रकृती सुधारत असल्याचं आणि तो मेडिकल ट्रिटमेंट घेतल असल्याचं स्पष्ट केलंय. त्यांनी प्रणीत मोरेच्या ऑफिशियल इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलंय की, "मित्रांनो, तुम्हाला सर्वांसोबत एक अपडेट शेर करायची होती. आता प्रणितची प्रकृती ठीक आहे. आम्ही 'बिग बॉस टीम'शी सतत संपर्कात आहोत आणि ते आम्हाला त्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट देत आहेत. तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी, पाठिंब्यासाठी आणि प्रार्थनांसाठी खूप खूप धन्यवाद... कृपया त्याला लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना करत राहा... जय हिंद, जय महाराष्ट्र...!"

घराबाहेर जाण्यासाठी कोण नॉमिनेट होतं?
प्रणीत मोरे सध्या एका सीक्रेच रूमध्ये ठेवण्यात आलं आहे. तो घरातून बाहेर गेला असला तरीसुद्धा त्याला एका सीक्रेट रूमध्येच उपचारांसाठी ठेवण्यात आलं आहे. त्याला कोणतेही विशेष अधिकार देण्यात आलेले नाहीत. त्याच्या जाण्यानंतर, आणखी एक नॉमिनेशन कार्य घेण्यात आलं. ज्यामध्ये घरातील 5 सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलं. यामध्ये फरहाना भट्ट, गौरव खन्ना, नीलम गिरी, अभिषेक बजाज आणि अशनूर कौर यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























