Pranit More:पुन्हा सलमानवर जोक करणार का? प्रणित मोरेने हातच जोडले, पापारझींच्या प्रश्नावर हसत हसतच म्हणाला..
आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर प्रणित मोरेला सगळे विचारतायेत की पुन्हा सलमानवर जोक करणार की नाही?

Pranit More: सलमान खानचा लोकप्रिय शो बिग बॉस 19 (Bigg Boss 19) नुकताच संपला. गौरव खन्ना या सीजनचा विजेता झाला तर फरहाणा भट उपविजेती ठरली. मराठमोळा प्रणित मोरे तिसरा आला. स्टँड अप कॉमेडी करत बिग बॉसच्या फिरायला तिकीट मिळवणारा प्रणित त्याच्या विनोदी शैलीमुळे घराघरात पोहोचला. त्याच्या साधेपणाने आणि नंतर कॉमेडीने सर्वांची मने जिंकली. प्रणितने त्याच्या स्टॅन्ड अप कॉमेडीच्या शोमध्ये अनेक कलाकारांवर जोक केले होते. यात सलमान खानही होता. सुरुवातीला सलमान खानने प्रणितला चांगलंच सुनावलं होतं. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर प्रणित मोरेला सगळे विचारतायेत की पुन्हा सलमानवर जोक करणार की नाही? यावर प्रणितने त्याच्या खास अंदाज उत्तर दिलय.
काय म्हणाला प्रणीत मोरे?
बिग बॉस संपल्यानंतर सर्व स्पर्धक एकत्र भेटले. यातीलच प्रणित मोरे आणि अभिषेक यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये पापराजी प्रणितला आता पुन्हा सलमान वर जोक करणार का असा प्रश्न विचारतात. त्यावेळी प्रणित हसत हसतच हात जोडतो. याच प्रश्नावर अभिषेक म्हणतो, सलमानाचा माफ करणार नाही. त्यावर प्रणितही गमतीत म्हणतो, मी खुश राहावं असं तुम्हाला वाटत नाही का. अच्छे है यार, सलमान भाई बहुत अच्छे है. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्रणित आणि अभिषेक बजाजच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत या दोघांचं बाहेर आल्यावर लगेच पॅचअप झालं अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. घरात असताना प्रणिताने अभिषेकमध्ये भांडण झालं होतं. आता बिग बॉस संपल्यानंतर दोघेही घरातील भांडण विसरून पुन्हा मित्र झाले आहेत. काहींनी प्रणित बारीक झाल्याच म्हटलं.
View this post on Instagram
आता बिग बॉसचा हिंदी सीजन संपल्यानंतर मराठी बिग बॉसचा सहावा सीजन प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सीजन ची प्रेक्षकांची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत आहे. कलर्स मराठी या संदर्भातील अपडेट्स सोशल मीडिया पेजवर शेअर करत आहे.























