Prakash Raj on Politics : 'मला विकत घेण्याइतके ते श्रीमंत नाहीत', भाजप प्रवेशाच्या चर्चांवर प्रकाश राज यांचा पूर्णविराम
Prakash Raj on Politics : अभिनेते प्रकाश राज यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होत्या. पण आता या चर्चांना प्रकाश राज यांनीच पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळतंय.
Prakash Raj on Politics : लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात अनेक कलाकार सध्या उतरत असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच अनेक कलाकार कोणत्यातरी पक्षाच्या राजकीय भूमिकेला पाठिंबा दर्शवत त्या पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचं चित्र आहे. त्याचप्रमाणे अनेक कलाकरांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा देखील रंगू लागल्या आहेत. अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांच्या देखील भाजप (BJP) चर्चांच्या भूमिका मागील अनेक दिवसांपासून सुरु होत्या. त्यावर प्रतिक्रिया देत प्रकाश राज यांनी स्वत: या सगळ्यावर पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळतंय.
प्रकाश राज यांना काही महिन्यांपूर्वी ईडीचं समन्स बजावण्यात आलं होतं. प्रणव ज्वेलर्स मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रकाश राज यांच्यावर ईडीची टाच बसली. अनेक सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर प्रकाश राज व्यक्त होत असतात. त्यामुळे त्यांच्या राजकीय एन्ट्रीच्याही जोरदार चर्चा सुरु होत्या. पण यावर ट्वीट करत प्रकाश राज यांची प्रतिक्रिया समोर आलीये. प्रकाश राज यांच्या राजकारणाच्या एन्ट्रीच्या चर्चांनी त्यांच्या चाहत्यांना देखील धक्का बसला होता. पण प्रकाश राज यांच्या प्रतिक्रियेमुळए चाहत्यांचा देखील संभ्रम दूर झाल्याचं पाहायला मिळत आहे.
प्रकाश राज यांनी काय म्हटलं?
प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट रिशेअर केली आहे. आज दुपारी 3 वाजता प्रकाश राज हे भाजपात प्रवेश करणार आहेत, अशा आशयाची ती पोस्ट होती. यावर प्रकाश राज यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'मला वाटतं त्यांनी प्रयत्न केला असेल. पण, नंतर त्यांना कळलं असेल की ते इतके श्रीमंत(वैचारिकदृष्ट्या) नाहीत की मला विकत घेऊ शकतील. तुम्हाला काय वाटतं?'
I guess they tried 😂😂😂 must have realised they were not rich enough (ideologically) to buy me.. 😝😝😝.. what do you think friends #justasking pic.twitter.com/CCwz5J6pOU
— Prakash Raj (@prakashraaj) April 4, 2024
प्रकाश राज यांचं भाजपवर टीकास्त्र
निवडणुकांआधीपासून प्रकाश राज त्यांची मतं परखडपणे मांडत असल्याचं पाहायला मिळतं. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांच्याविरोधातील अनेक पोस्ट प्रकाश राज यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजप चर्चांमुळे अनेकांना धक्का बसला होता. पण प्रकाश राज यांनी आता या सगळ्या चर्चांचं खंडन केलं आहे.