Prajakta Mali Left Mumbai: 'बाय बाय मुंबई, लवकरच...'; प्राजक्ता माळीनं मुंबई सोडली? अभिनेत्रीची पोस्ट पाहून चाहत्यांची चिंता वाढली
Prajakta Mali Left Mumbai: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं नुकतीच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामुळे तिनं चाहत्यांना कोड्यात टाकलं आहे.

Prajakta Mali Left Mumbai: मराठी सिनेविश्वातील (Marathi Industry) प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका, नृत्यांगणा आहे. यासोबतच ती एक कवयित्री, उद्योजिका म्हणून नावारुपाला आलीय. पण, त्यासोबतच प्राजक्ता माळी महाराष्ट्रभरातील असंख्य मुलांच्या गळ्यातील ताईत आहे. तर, अनेक तरुणींची ती स्टाईल आयकॉन आहे. पण, आता याच प्राजक्ता माळीनं चाहत्यांना धक्का दिला आहे. प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चाहत्यांची धडधड वाढली आहे.
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं नुकतीच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामुळे तिनं चाहत्यांना कोड्यात टाकलं आहे. प्राजक्ताची स्टोरी पाहून चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. प्राजक्तानं एअरपोर्टवरचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच, त्यासोबत "बाय बाय मुंबई. मला तुझी खूप आठवण येईल. मी लवकरच परत येईन..." असं इमोशनल कॅप्शन दिलं आहे. प्राजक्ताच्या एका पोस्टमुळे चाहते विचारात पडले आहेत. प्राजक्तानं असं कॅप्शन का दिलंय? ती खरंच मुंबई सोडून चालली का? असे अनेक प्रश्न त्यांना पडले आहेत.

पण, प्राजक्तानं पुढे टाकलेल्या स्टोरीमध्येच गूढ उकललं आहे. मुंबईला बाय म्हणणारी पोस्ट शेअर केल्यानंतर प्राजक्तानं आणखी एक फोटो शेअर केला आहे. ती स्टोरी पाहून प्राजक्ताच्या स्टोरीमागचं गूढ उकललं आणि चाहत्यांचा जीव भांड्यात पडला.
View this post on Instagram
प्राजक्तानं इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची संपूर्ण टीम, ज्यात सचिन मोटे, सई ताम्हणकर, प्रसाद ओक, अमित फाळके, सचिन गोस्वामी दिसतायत. प्राजक्तानं स्पष्ट केलंय की, हे सर्वजण एका खास शोसाठी नागपूरला गेले आहेत. म्हणजे, प्राजक्ता एका कार्यक्रमासाठी गेली असल्यामुळे ती मुंबईला बाय बाय म्हणत होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Prajakta Mali : प्राजक्ता माळी बॉलिवूडचा बादशाह शाहरुखला 17 वेळा धडकली; नेमकं प्रकरण काय?
























