Poonam Pandey : कुटुंबाला वाळीत टाकलं, पती सोडून गेला; 'मी एकटीच मरणार', काय घडलं होतं पूनम पांडेच्या आयुष्यात
Poonam Pandey : अभिनेत्री पूनम पांडेच्या निधनानंतर संपूर्ण फिल्म इंडस्ट्री शोकाकुल अवस्थेत आहे. पूनमच्या निधनानंतर सोशल मीडियावरही उलट सूलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना देखील पूनमच्या अचानक जाण्याने धक्का बसलाय.
Poonam Pandey : अभिनेत्री पूनम पांडेच्या (Poonam Pandey) निधनानंतर संपूर्ण फिल्म इंडस्ट्री शोकाकुल अवस्थेत आहे. पूनमच्या (Poonam Pandey) निधनानंतर सोशल मीडियावरही उलट सूलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना देखील पूनमच्या अचानक जाण्याने धक्का बसलाय. कंगणा राणावतनेही (Kangana) पूनमच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलंय. कंगणा राणावतच्या 2022 मध्ये आयोजित केलेल्या 'लॉक अप' या रिअॅलिटी शोमध्ये पूनम देखील दाखल झाली होती. पूनम वाद आणि भांडणामुळे चर्चेत आली होती. दरम्यान, याच शोमध्ये पूनम कौटुंबिक समस्या आणि पती सोडून गेल्याने भावनांना वाट करुन दिली होती. पूनमने या शोच्या एका एपिसोडमध्ये सांगितले की, "पूनमच्या खराब झालेल्या इमेजमुळे समाजाने तिच्या कुटुंबियांना वाळीत टाकण्यात आले होते. शिवाय पतीही सोडून गेला होता."
पूनमच्या कुटुंबियांना टाकले होते वाळीत
पूनमने अभिनेता करणवीर बोहरा याच्या बोलताना म्हटले की, "मी 3-4 वर्षांपूर्वी घडलेलं सांगत आहे. माझे आई-वडिल आणि बहिण आम्ही सारे एकत्रित राहत होतो. ते माझ्या कुटुंबाचे सदस्य होते. त्यामुळे त्यांना वाळीत टाकण्यात आले होते. तेव्हा माझे आई-वडिल मला काहीच म्हटले नाहीत. कारण कुटुंबाचा सर्व खर्च मी उचलत होते. मी कधी कोणाबाबत चुकीचे बोलले का? अशा प्रकारचे एक तरी आर्टिकल मला आणून दाखवा. मी फक्त माझे काम करत असते", अशी प्रतिक्रिया पूनमने व्यक्त केली होती.
रडत असताना पूनम म्हणाली...
'लॉक अप' या शोमध्ये अंकिता लोखंडे गेस्ट म्हणून आली होती. यावेळी अंकिताने खऱ्या प्रेमाबाबत भाष्य केलं होतं. तिने एका खास व्हिडीओच्या माध्यमातून मुन्नवर फारुकी आणि अंजली अरोरा यांच्यात वाढत असलेल्या संबंधाबाबत भाष्य केले होते. अंकिता गेल्यानंतर पूनमच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यानंतर अंजली अरोराने पूनमला कशामुळे रडत आहेस? असे विचारले. त्याला उत्तर देताना पूनम म्हणाली,"मी चार वर्षे प्रयत्न केले. मात्र, मला काहीही करता आले नाही. माझं लग्न टिकायला पाहिजे होतं. मला वाटत नाही की, मी आयुष्यात काही करु शकेन, एकटीच मरेन."
एका मॅगझीनच्या शूटमुळे आई झाली होती नाराज
पूनम पांडेने 2015 मध्ये एक मुलाखत दिली होती. पूनमच्या कुटुंबियांना तिचे सिनेक्षेत्रात आणि मॉडेलिंगमध्ये काम करणे पसंत नव्हते. पूनमने सॉफ्ट इंजिनिअर बनावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. पूनमने एका मॅगझीन शूटवेळी बिकनी घातली होती. ते पाहून तिची आई नाराज झाली होती. "ज्याने तुझे अशाप्रकारचे फोटो काढलेत त्याला चप्पलेने मारेन", अशी भावना पूनमच्या आईने व्यक्त केली होती.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या