(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Poonam Pandey Death News : पूनम पांडेच्या निधनाचे वृत्त खरे की खोटे?
Poonam Pandey Death News : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) हिचे कॅन्सरमुळे सर्वायकल (Cervical Cancer) कॅन्सरमुळे निधन झाले असल्याची माहिती तिच्याच अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन देण्यात आली आहे.
Poonam Pandey Death News : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) हिचे कॅन्सरमुळे सर्वायकल (Cervical Cancer) कॅन्सरमुळे निधन झाले असल्याची माहिती तिच्याच अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन देण्यात आली आहे. मात्र, तिच्या नेहमी अजब दावे करायच्या सवयीमुळे अजूनही लोकांना तिच्या निधनाच्या बातमीवर विश्वास बसत नाहीये. तिच्या निधनाची बातमी खरी आहे की खोटी? याबाबत चाहत्यांकडून काही दावे करण्यात येत आहेत.
पूनम पांडेच्या पोस्टवर चाहत्यांनी कोणते दावे केलेत?
अभिनेत्री पूनम पांडेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या पोस्टवर चाहत्यांनी काही दावे केले आहेत. "आम्हाला आशा की आहे की, ही पोस्ट फेक असेल", अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. हा चर्चत राहण्यासाठी मार्केटिंगसाठीचा प्लॅन असू शकतो. मात्र, खरंच निधन झाले असेल तर भावपूर्ण श्रद्धांजली. हा प्रँक असेल दुसऱ्या पूनमचे निधन झाले असेल, असे दावे तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरिल पोस्टवर चाहत्यांनी केले आहेत.
इन्स्टाग्राम आयडी हॅक झाल्याचा चाहत्यांचा दावा
अभिनेत्री पूनम पांडे हिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिचे सर्वायकल (Cervical Cancer) कॅन्सरमुळे निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, तिच्या चाहत्यांनी याबाबत काही दावे केले आहेत. पूनमचे अकाऊंट हॅक झाले असल्याचे दावेही सोशल मीडियावर चाहत्यांकडून करण्यात आले आहेत.
सिनेक्षेत्रात कधी केले पदार्पण?
अभिनेत्री पूनम पांडे ही मूळची दिल्लीतील होती. 11 मार्च 1991 रोजी तिचा जन्म झाला. अतिशय साधारण कुटुंबात जन्मलेली पूनम पांडे तिच्या अजब दाव्यांमुळे, वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असायची. तिने 2013 मध्ये नशा या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'द जर्नी ऑफ कर्मा' आणि 'मालिनी अँड कंपनी', 'दिल बोले हडिप्पा' या सिनेमांमधून तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती. याशिवाय छोट्या पडद्यावरील 'आशिकी तुमसेही', 'नादानिया', फिअर फॅक्टर : खतरो के खिलाडी यो शोंच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत होती.
पती सॅम बॉम्बेवर हिंसाचाराचे आरोप
अभिनेत्री पूनम पांडे हिने 2020 मध्ये बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत विवाह केला होता. दरम्यान, विवाह झाल्यानंतर 12 दिवसांनी तिने पती सॅमवर हिंसाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यामुळे सॅम बॉम्बेला गोवा पोलिसांकडून अटक देखील झाली होती.
View this post on Instagram
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या
Poonam Pandey Death : बोल्ड सीन, बोल्ड स्टेटमेंट ते अजब दावे, सतत चर्चेतील पूनम पांडेचं निधन