(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Poonam Pandey manager : पूनम पांडेच्या निधनाबाबत मॅनेजर निकिता शर्मा काय म्हणाली?
Poonam Pandey manager : अभिनेत्री पूनम पांडे हिचे सर्वायकल कॅन्सरमुळे निधन झालय. वयाच्या 32 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतलाय. पूनम गेल्या अनेक दिवसांपासून सर्वायकल कॅन्सर (Cervical Cancer) या आजाराशी झुंज देत होती. पूनमच्याच इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या निधनाचे वृत्त देण्यात आले.
Poonam Pandey manager : अभिनेत्री पूनम पांडे हिचे सर्वायकल कॅन्सरमुळे निधन झालय. वयाच्या 32 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतलाय. पूनम गेल्या अनेक दिवसांपासून सर्वायकल कॅन्सर (Cervical Cancer) या आजाराशी झुंज देत होती. पूनमच्याच इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या निधनाचे वृत्त देण्यात आले. तिची मॅनेजर निकिता शर्मा (Nikita Sharma) हिने निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
मॅनजर निकिता शर्मा काय म्हणाली?
पूनम पांडे हिची मॅनेजर निकिता शर्मा हिने एक पत्र जारी केले आहे. या पत्रात निकिता लिहिते, "लोकप्रिय अभिनेत्री आणि सोशल मीडियावरिल महत्वाचा चेहरा असलेल्या पूनम पांडेचे सर्वायकल कॅन्सरमुळे निधन झालय. त्यामुळे सिनेक्षेत्रातील अनेकांना धक्का बसलाय. 32 वर्षीय पूनम तिच्या मॉडेलिंग आणि सोशल मीडियावरिल पोस्टमुळे नेहमी चर्चेत असायची. तिने सर्वायकल कॅन्सरशी धाडसाने झुंज दिली."
'कॅन्सरबाबत जागृती निर्माण करण्याची गरज'
"कॅन्सरशी लढण्याचे तिचे स्पीरिट आणि तिचा संघर्ष याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तिच्या जाण्यामुळे मॉडेलिंग क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. पूनम गेल्यानंतर सर्वायकल कॅन्सरबाबत जागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. पूनमने केवळ सिनेक्षेत्रातच नव्हे तर सोशल मीडियावर देखील एक वेगळी ओळख निर्माण केली होती. अभिनयामुळे तिने अनेकांच्या मनात घर केले आहे.", असे पूनमची मॅनेजर निकिता हिने म्हटले आहे.
डिझायनर रोहित वर्मा 'एबीपी न्यूज'शी बोलताना काय म्हणाला?
दोन दिवसांपूर्वी मी पूनम पांडेसोबत शूटींग केलं होते. मला पूनम गेलीये असे अजूनही वाटत नाही. रोहित वर्मा 'एबीपी न्यूज'शी बोलताना म्हणाला, शूटिंगवेळी पूनम पांडे अतिशय तंदुरुस्त होती. त्यावेळी तिला कर्करोग झालाय, असे वाटत नव्हते. मला देखील तिच्या टीमकडून निधनाची माहिती देण्यात आली आहे. पूनम कानपूर येथील निवासस्थानी गेली होती. त्याठिकाणी तिचे निधन झाले आहे.
कसा होता पूनमचा प्रवास?
अतिशय साधारण कुटुंबातून तिने बॉलिवूडमधील प्रवासाला सुरुवात केली होती. पूनम पांडे तिच्या अजब दाव्यांमुळे, वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असायची. नशा या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'द जर्नी ऑफ कर्मा' आणि 'मालिनी अँड कंपनी', 'दिल बोले हडिप्पा' या सिनेमांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या
Poonam Pandey Death : लग्नाच्या 12 दिवसांनंतर पूनम पांडेने पतीवर केले होते गंभीर आरोप