Pooja Sawant : पूजा सावंतचं नवं गाणं, लग्नानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला
Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंत ही काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. त्यानंतर आता ती पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Pooja Sawant : पूजा सावंतचं नवं गाणं, लग्नानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला Pooja Sawant Marathi actress new song released Nach GO Baya Entertainment update Pooja Sawant : पूजा सावंतचं नवं गाणं, लग्नानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/06/8c3a65b4311210f04f0c71a7b6172b261720246931777720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pooja Sawant : आपल्या सहज सुंदर अभिनयाने अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. काही महिन्यांपूर्वीच पूजा ही लग्नबंधनात अडकली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा ती प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झालीये. पूजाचं नाच गो बया हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यामध्ये ती अक्षया नाईक आणि आकांक्षा गाडेसोबत थिरकली आहे. तसेच यामध्ये तिच्या सोबत निक शिंदे आणि आयुष संजीवही थिरकले आहे.
आई, मुलगी, बहीण, पत्नी, प्रेयसी आणि मैत्रीण अशा निरनिराळ्या रुपामध्ये आपण स्त्रीला ओळखत आहोत. पण स्त्रीचं रुप एवढ्यापुरतचं मर्यादित नाही, तर या स्त्रीत्वाची व्याख्या याहीपेक्षा अधिक मोठी आहे. स्त्रीचा आदर सन्मान करणं हे प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे. स्त्री ही कायम कर्तव्याचं ओझं घेऊनच जगत आली आहे. अशातच नारी वर्गाला गवसणी घालायला एक नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
पूजा सांवतचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
'लयभारी म्युझिक' आणि 'माऊली फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'नाच गो बया' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. सुप्रसिद्ध संगीतकार प्रशांत नकती यांनी या गाण्याची संगीताची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी उत्तमरीत्या पेलवली आहे. दिग्दर्शनात प्रशांत यांचं पदार्पण असून या गाण्याची कन्सेप्टही त्यांची आहे. तर हे सुंदर अस गाणंदेखील त्यांनी शब्दबद्ध केलं आहे. पूजाला या गाण्यात अक्षया नाईक, आकांक्षा गाडे, ताश्वी भोईर, निक शिंदे आणि आयुष संजीव साथ देत आहेत.
पूजाच्या गाण्याची प्रेक्षकांना उत्सुकता
पूजाचं हे गाणं चाहत्यांच्या ही तितकचं पसंतीस पडत आहे. आयुष संजीव व निक शिंदे आयोजित महिलांसाठीच्या पारंपरिक कार्यक्रमात पूजाने चारचाँद लावले. पूजाने या गाण्याबाबतचा अनुभव सांगत म्हटलं की, "स्त्री या विषयावर आधारित असलेल्या या गाण्यात मला नृत्य करायची संधी मिळाली ही खूप अभिमानास्पद बाब आहे. महिला हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणूनच सर्व महिलांना त्यांच्या कामातून एक दिवस सुट्टी मिळावी आणि त्यांनी त्यांचा तो दिवस जगावा अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे प्रत्येक महिला या गाण्यावर थिरकत तिचा तो दिवस साजरा करेल याचीही मला खात्री आहे". 'नाच गो बया' हे गाणं 'लयभारी म्युझिक' या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित झालं आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)