एक्स्प्लोर

Sharyu Sonawane: प्लास्टिकच्या बरणीत श्वानाचं तोंड अडकलं, 3-4 दिवस अन्न, पाणीविना भटकला; मराठी अभिनेत्री धावली मदतीला

Marathi Actress Saves Stray Dog: अभिनेत्री शरयू सोनवणे हिनं अडचणीत सापडलेल्या श्वानाची मदत केलीये.

Sharyu Sonawane Rescues Dog Trapped In Plastic Jar: माणूस असो किंवा जनावर, प्रत्येकाला भावना असतात. असं म्हणतात की कुत्रा या प्राण्यापेक्षा इतर कुणीही इमानी प्राणी नाही. काही जण मुक्या प्राण्यांना खाऊ घालतात, काळजी घेतात. पण काही जण स्ट्रीट कुत्र्‍यांकडे  सर्रास दुर्लक्ष करतात. इतकंच नाही तर, काही जण मुक्या प्राण्यांचा (Stray Dogs) भयंकर छळ करतात. परंतु, या जगात अशी देखील माणसं आहेत, जे  संकटात सापडलेल्या मुक्या प्राण्यांची काळजी घेतात.  सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Social Media) होत आहे. या व्हिडीओत पारू फेम शरयू सोनवणे (Sharyu Sonawane) या अभिनेत्रीने अडचणीत सापडलेल्या  श्वानाची मदत केली आहे.  श्वानाचं तोंड एका प्लास्टिकच्या बरणीत अडकलं होतं.  रेस्क्यू टीमच्या मदतीने  अभिनेत्रीने श्वानाचे प्राण वाचवले.  सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

प्लास्किटच्या बरणीत तोंड अडकलेल्या श्वानाला जीवनदान (Dog stuck in plastic jar rescued in pune)

 झी मराठीवरील पारू या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शरयू सोनवणे.  अभिनेत्रीनं एक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे. या व्हिडीओत एक श्वान दिसत आहे आणि त्याचं तोंड एका बरणीत अडकलं आहे. यामुळे श्वानाला नीट खाता येत नाही. श्वान अस्वस्थ होतो.  रेस्क्यू टीमच्या मदतीने श्वानाची सुटका करण्यात येते. त्याचं तोंड बरणीतून काढण्यात येते. अभिनेत्रीने याचा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे. तिनं व्हिडीओ शेअर करत कॅप्शन देखील दिलं आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'पुणे  सिंहगड रोड नांदेड सिटीमध्ये आज  सकाळच्या सुमारास एक  श्वान दिसला होता.  त्याचं तोंड प्लास्टिकच्या बरणीमध्ये  अडकलं होतं. श्वान मदतीच्या शोधात होता'.

अभिनेत्रीनं केली श्वानाची मदत (Sharayu Sonawane Helps Stray Dog)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SharayuSonawane (@sharayusonawaneofficial)

'श्वान अस्वस्थ झाला होता. मदतीसाठी इकडे तिकडे धावत होता. जवळपास तीन दिवसांपासून तो मदतीच्या शोधात होता. अन्न - पाण्यासाठी संघर्ष करत होता. खूप लोकांन त्याला या अवस्थेत पाहिले. परंतु, कुणीही मदतीसाठी पुढे सरसावले नाही.  जर अशावेळी आपल्याला थेट मदत करता आली नाही, तर आपण  एनजीओची मदत  घेऊन मुक्या प्राण्यांची मदत करु शकता. यावेळी हार्ट पुणे आणि स्वप्नील आंबेप यांनी येऊन 4-5 तासांच्या प्रयत्नांनंतर श्वानाची सुटका केली.  मी सर्वांना विनंती करते की, प्लास्टिकची बरणी किंवा काचेचे वस्तू उघड्यावर टाकू नका.  भुकेले तहानलेले जनावर त्या वस्तूंमध्ये तोंड घालतात. मुक्या प्राण्यांना समज नसते, परंतु आपल्याला असते. आपल्या थोडया जबाबदारीमुळे मुक्या प्राण्याचा जीव वाचू शकतो', असं अभिनेत्रीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

अभिनेत्री शरयूचं कौतुक

अभिनेत्रीनं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांनी कमेंट करुन अभिनेत्रीचं कौतुक केलं. तसेच  चाहत्यांनी शरयुच्या कामाला दाद दिली. 

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Embed widget