Parth Pawar, Jacqueline Fernandez At Lalbaugcha Raja Darshan: पार्थ पवारांसोबत डोक्यावर पदर घेऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ती' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
Parth Pawar And Jacqueline Fernandez At Lalbaugcha Raja Darshan: उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्रीही होती.

Parth Pawar And Jacqueline Fernandez At Lalbaugcha Raja Darshan: सध्या संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव (Ganeshotsav 2025) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Deputy Chief Minister Ajit Pawar) सुपुत्र पार्थ पवारांनी (Parth Pawar) लालबागच्या राजाचं दर्शन (Lalbaugcha Raja) घेतलं. पण, यावेळी पार्थ पवारांसोबत आणखी एक व्यक्ती होती, जिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पार्थ पवार ज्यावेळी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेले, त्यावेळी त्यांच्यासोबत डोक्यावर पदर घेतलेली एक बॉलिवूड अभिनेत्रीही (Bollywood Actress) होती. पार्थ पवार आणि बॉलिवूड अभिनेत्रीनं एकत्र लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. एवढंच काय तर, दानपेटीत पैसे टाकण्यासाठी पार्थ पवारांनी स्वतःजवळचे पैसे या अभिनेत्रीला दिल्याचंही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. दरम्यान, पार्थ पवार आणि या बॉलिवूड अभिनेत्रीचा एकत्र दर्शन घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
लालबागच्या राजाच्या दर्शनाला पार्थ पवारांसोबत आलेली अभिनेत्री दुसरी, तिसरी कोणीच नसून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) होती. लालबागच्या राजाच्या आरतीसाठी (Lalbaug Rajachi Aarti) दोघेही एकत्र हजर होते. लालगबाच्या दर्शनाला पार्थ पवार आणि जॅकलीन सोबत गेले होते, यावेळी दानपेटीत पैसे टाकण्यासाठी पार्थ पवारांनी स्वतःजवळचे पैसे जॅकलीनला दिल्याचं कॅमेरात कैद झालं आहे.
जॅकलीन आणि पार्थ पवार एकत्र लालबागच्या राजाच्या चरणी लीन
लालबागच्या राजाच्या चरणी रोज हजारो भाविक भक्तीरसात तल्लीन झाल्याचं पहायला मिळतं. शेकडो सेलिब्रिटीही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आवर्जून येता. गणेश चतुर्थीच्या दिवशी असंच काहीसं चित्र पहायला मिळालं. जॅकलिन फर्नांडीस लालबागच्या राजाच्या दर्शनाला आली, पण खरी चर्चा तिच्या येण्याची नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सुपुत्राबरोबर झालेल्या एन्ट्रीची रंगली. पार्थ पवारांसोबत जॅकलिनने लालबागचं दर्शन घेतलं आणि चर्चेला एक विषय मिळाला.
एरव्ही बोल्ड आणि ग्लॅमरस आऊटफिट्समध्ये दिसणारी जॅकलीन लालबागच्या राजाच्या दरबारात अगदी पारंपारिक वेशात दिसून आली. एवढंच काय तर, ती अगदी डोक्यावर पदर घेऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतान दिसली.
पार्थ पवारांनी खिशातून नोटा काढल्या आणि...
इतकंच नाही, पार्थ आणि जॅकलिनक एकत्र आल्यानं सर्वांच्याच नजरा त्यांच्याकडे वळल्या होत्या. सोशल मीडियावर दोघांचा एकत्र दर्शन घेतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात दर्शन घेताना पार्थ पवार यांनी त्यांच्या खिशातून काही नोटा काढल्या आण जॅकलिनच्या हातात दिल्या. तिनं त्या नोटा लगेचच तिथे असलेल्या दानपेटीत टाकल्या. त्यानंतर दोघांनीही लालबागच्या राजाच्या पायावर डोकं टेकवून दर्शन घेतलं. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
पाहा व्हिडीओ : पार्थ पवार आणि जॅकलीन फर्नांडिसनं घेतलं एकत्र दर्शन
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















