(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pakistani Web Series Controversy : पाकिस्तानी वेब सीरिज 'सेवक' वरुन होतोय गोंधळ; काय आहे नेमकं प्रकरण?
Pakistani Web Series Controversy : सेवक - द कन्फेशन ही वेब सीरिज पाकिस्तानमध्ये तयार करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये भारत आणि हिंदूंविरुद्धचा द्वेष दाखवण्यात आला आहे.
Pakistani Web Series Sevak Controversy : पाकिस्तानमध्ये कट्टरतावाद शिगेला पोहोचला आहे. येथील हिंदूंची अवस्था कोणापासून लपलेली नाही. दररोज हिंदू आणि शीखांवर अत्याचाराच्या बातम्या येत असतात. हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर केले जाते. हिंदूंच्या मुलींना उचलून नेले जाते आणि त्यांना मुस्लिम बनवून त्यांचे लग्न लावले जाते. इतके अत्याचार होऊनही पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांमध्ये हिंदूंबद्दलचा द्वेष कमी होताना दिसत नाही. तेथील कट्टरतावाद्यांना हिंदूंबद्दल किती द्वेष आहे, याचा अंदाज पाकिस्तानात बनवलेल्या वेबसीरिजवरून लावता येतो. या वेब सिरीजचे नाव 'सेवक - द कन्फेशन' (Sevak The Confession) असे ठेवण्यात आले आहे. नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, त्यामुळे बराच गदारोळ झाला आहे.
हिंदू आणि भारताबद्दल द्वेष दाखवला
या वेब सिरीजमध्ये हिंदूंविरोधात किती द्वेष आहे, हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. यामध्ये 1984 ची दंगल, गुजरात दंगल, बाबरी मशीद वाद दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये हिंदू संतांविरोधात द्वेषभावना पोसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय दीप सिद्धू, हेमंत करकरे, गौरी लंकेश, जुनैद खान यांच्या आयुष्यातील काही भागही या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आला आहे. सोशल मीडियावर या वेब सिरीजचा निषेध होत आहे. त्याच वेळी, काही लोक या सिरीजला केवळ प्रपोगंडा म्हणत जोरदार ट्रोल देखील करत आहेत.
#Trailer A Bold Take on #Hindutva Pakistani 8 episode web series #Sevak The Confessions’based on true events between 1984& 2022.The series is based on the life of Deep S Sidhu,Gauri Lankesh,Hemant Karkare, Graham Staines, Junaid Khan,Surekha Bohtmange.Babri Mosque & Gujarat riots pic.twitter.com/UpAvkRMPrj
— Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) December 7, 2022
After watching this pic.twitter.com/ARMdUKDZqw
— Satyajit 👁️🗨️ (@satyajit_tw) December 7, 2022
Why is Pakistan making tv series on Indian people?
— Neelima 🇮🇳 (@NParavastu) December 7, 2022
यूजर्सने जोरदार ट्रोल केले
एका यूजरने लिहिले की, 'हे स्वस्त प्रपोगंडाचे उत्तम उदाहरण आहे'. तर, दुसर्याने लिहिले, 'स्टोरी काय आहे, ते कळले नाही. मिर्झापूरसारख्या शिव्या देऊन त्याचा फटका बसणार नाही. म्हणजे त्यात बाबरी मशीद दिसली आणि ती 1984 ची दंगलही नाही. त्याच वेळी, दुसर्या यूजरने लिहिले की, 'कॉमेडी छान आहे, पण आम्ही नेहमीच अशा क्षुल्लक गोष्टींसह राहत नाही'. त्याचबरोबर काही यूजर्सनी या वेब सीरिजला कचरा असं म्हटलं आहे.
या वेब सीरिजचे लेखन साजी गुल यांनी केले असून दिग्दर्शन अंजुम शहजाद यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :