एक्स्प्लोर

Asha Bhosle: आशाताईंच्या जाण्याने पाकिस्तानही शोकाकूल; अभिनेता अन् गायकांकडून दु:ख व्यक्त, म्हणाले...

Pakistani Celebrities Reaction On Asha Bhosle Death News: आशा भोसले यांच्या निधनावर पाकिस्तानी कलाकारांनी शोक व्यक्त केलं आहे.

Pakistani Celebrities Pay Heartfelt Tribute to Asha Bhosle: गायिका आशा भोसलेंच्या (Asha Bhosle) निधनानंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या सुमधूर आवाजानं प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं.  लहानमुलांपासून, तरुणाई आणि ज्येष्ठ व्यक्ती आशा ताईंची गाणी (Music Industry) आवडीने ऐकतात.  त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत  सर्व वयोगटातील लोकांच्या मनावर आणि ह्रदयावर राज्य केलं आहे. आशा ताई केवळ भारतीयांच्याच लाडक्या नव्हत्या तर,  संपूर्ण जगात त्यांचे चाहते आहेत.  विशेष म्हणजे, सीमेपलीकडील  पाकिस्तानातही  त्यांच्या गायनाचे अनेक चाहते आहेत. म्हणूनच आशा भोसले यांच्या निधनाने केवळ भारतावरच नाही तर, पाकिस्तानावरही शोककळा पसरली आहे.

पाकिस्तानी कलाकारांकडून आशा भोसलेंना श्रद्धांजली(Pakistani Celebrities Reaction To Asha Bhosle Death News)

आशा भोसले यांच्या निधनानंतर पाकिस्तानी लोकांनीही दु:ख व्यक्त केलंय.  अनेक प्रमुख  पाकिस्तानी सिनेसृ्ष्टीतील कलाकारांनी  सोशल मीडियावर एकत्र येऊन आपले दु:ख व्यक्त केले आहे. तसेच आशाताईंना श्रध्दांजली वाहिली आहे. गायक अभिनेता अली जफरने आपल्या सोशल मीडिया हँडलवर आशा भोसले यांचा फोटो  शेअर करुन  दु:ख व्यक्त केलं आहे. अभिनेता  आपल्या पोस्टमध्ये म्हणाला, 'आशा भोसले यांचं कार्य येणाऱ्या पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहिल. असे आवाज काळाबरोबर पुसले जात नाहीत, उलट  ते काळाचाच  एक भाग  बनतात', असं अली जफर म्हणाला.

अलि जफर व्यतिरिक्त  अदनान सिद्दीकी, अॅक्टर  यासिर हुसैन, अहमद अली बट यांसारख्या दिग्गज पाकिस्तानी कलाकारांनी आशा ताईंच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. ' एका युगाचा अंत झाला' असं म्हणत त्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.  अहमद अली बटने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर, 'तुमच्या अजरामर गाण्यांसाठी धन्यवाद', असं म्हणत आदरांजली वाहिली आहे. तसेच अदनान सिद्दीकीनेही आशा भोसलेंच्या निधनानंतर पोस्ट शेअर केली आहे. 'आशा भोसलेंना श्रध्दांजली.  रात अकेली है.. तुमच्या आवाजात अशी जादू होती की,  अगदी  एकाकी क्षणांनाही  भरुन टाकायचे.  आज तीच शांतता जड वाटत आहे.  तुम्ही आम्हाला दिलेल्या भावनांबद्दल धन्यवाद. तुम्ही स्वत: एक सुंदर आठवण  बनला आहात आणि तुम्ही मागे सोडलेली जादू कायम राहिल', असं अदनानने म्हटलं आहे. 

गायक शुजा हैदरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'त्यांचा आवाज संपूर्ण जगापर्यंत पोहोचला आहे.  त्यांनी आपल्या आवाजातून लाखो चाहत्यांना प्रेरणा दिली आहे. जगातील महान संगीतकारांमध्ये त्यांची आठवण कायम ठेवली जाईल', असं गायक म्हणाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'एका युगाचा अंत झाला..', आशा भोसलेंची अकाली एक्झिट, सिनेसृष्टीतील तिन्ही 'खान' भावुक, पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त

महत्त्वाच्या बातम्या

Ram Kadam On Tukaram Mundhe FDA Action On Pan Masala Ad: 'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
OTT trending Movie: OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
Sayaji Shinde On Omraje Nimbalkar: ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Embed widget