एक्स्प्लोर

Marathi Play : नात्यांमधील 'फिल्टर' दाखवणारं नाटक रंगभूमीवर, 'पाहिले न मी तुला' नाटकाचा मुहूर्त संपन्न 

Marathi Play : रंगभूमीवर लवकरच एक नवं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पाहिले न मी तुला असं या नाटकाचं नाव आहे. 

Marathi Play : सध्या नव्या नाटकांतून विषयांचं वैविध्य रंगभूमीवर पाहायला मिळत आहे. नाट्यगृहांवर लागणाऱ्या नाटकांच्या पाट्यांकडे नजर टाकली, तर नाटकांची नवी नावेही रसिकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यातच आता हटके शीर्षक असलेलं सुमुख चित्र आणि अनामिका प्रस्तुत ‘पाहिले न मी तुला' (Pahile na Me Tula) हे नवंकोर नाटक रंगभूमीवर येणार आहे. या नाटकाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी ही सुनिल हरिश्चंद्र यांनी सांभाळली आहे. 

‘सुमुख चित्र’ ही निर्मिती संस्था आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् च्या सहकार्याने अनेक नव्या नाट्यकृती रंगभूंमीवर आणणार आहे.  तसेच सुमुख चित्र’ संस्थेच्या माध्यामातून आगामी काळात अनेक चांगले सामाजिक विषय नाटकांच्या माध्यमातून रसिकांसमोर सादर केले जातील. नवोदित कलाकार, लेखक-दिग्दर्शक यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे.

नाटकाचा मुहूर्त संपन्न

सध्या जमाना ‘फिल्टर’चा आहे. एखादी गोष्ट अधिक छान असावी यासाठी 'फिल्टर’ चा वापर केला जातो. नवे नाते निर्माण करताना किंवा असलेले नाते जपताना महत्त्वाचा असेलला ‘फिल्टर’ अर्थात, दृष्टिकोन व विश्वास आपण जाणीवपूर्वक निर्माण करतो का ? योग्यवेळी तो वापरतो का? हे बघणं ही तितकंच आवश्यक असतं हे दाखवणाऱ्या ‘पाहिले न मी तुला’ या नाटकाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. या मुहूर्त प्रसंगी निर्माते प्रसाद कांबळी, अजय विचारे ही मान्यवर मंडळी उपस्थित होती. अंशुमन विचारे, हेमंत पाटील , सुवेधा देसाई  या कलाकारांच्या या नाटकात भूमिका आहेत.  

नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून  संगीत निनाद म्हैसळकर यांचे आहे. प्रकाशयोजननेची  जबाबदारी राजेश शिंदे यांनी सांभाळली आहे. वेशभूषा वरदा सहस्त्रबुद्धे तर रंगभूषा उदयराज तांगडी यांची आहे अरविंद घोसाळकर व प्रसाद सावर्डेकर यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली  आहे.                                      

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suvedha Desai Gaonkar 🌟Actor & Youtuber | Mumbai (@suvedhas__)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्यांदाच येतेय 'परदेसी गर्ल', 'या' अप्सरेच्या तालावर नाचणार इतर स्पर्धक?

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget