Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्यांदाच येतेय 'परदेसी गर्ल', 'या' अप्सरेच्या तालावर नाचणार इतर स्पर्धक?
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात एका खास स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्यांदाच एका 'परदेसी गर्ल'ची धमाकेदार एन्ट्री होणार आहे.
मुंबई : छोट्या पडद्यावरील मनोरंजनाचा बॉस असलेला बिग बॉस मराठीचा नवीन सीझन (Bigg Boss Marathi Season 5) लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस प्रेमींना या पर्वाची आतुरता लागली आहे. 28 जुलैपासून बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाला सुरुवात होणार आहे. यंदा बिग बॉस मराठीचा होस्ट अभिनेता रितेश देशमुख असणार आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात कोण-कोण स्पर्धक म्हणून येणार आहे, याची सर्वांना आतुरता लागली आहे. बिग बॉसच्या घरात एका खास स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्यांदाच एका 'परदेसी गर्ल'ची धमाकेदार एन्ट्री होणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात 'परदेसी गर्ल'ची एन्ट्री
बिग बॉसच्या घरात एका परदेशी अप्सरेची एन्ट्री होणार आहे. बिग बॉस अधिकृत इंस्टाग्रामवर बिग बॉस मराठीचा नाव प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये एक सुंदरी दिसत आहे. बिग बॉस मराठीमध्ये एका परदेशी अप्सरेची एन्ट्री होणार असल्याचं या प्रोमोमध्ये सांगण्यात आलं आहे. या प्रोमोमुळे बिग बॉसप्रेमींची उत्सुकता आणखी वाढली आहे. या परदेसी गर्लची घरात एन्ट्री किती खास असणार, हे लवकरच पाहायला मिळणार आहे.
अप्सरेच्या तालावर नाचणार इतर स्पर्धक?
प्रोमोमध्ये हटके फॅशन, किलर लूक आणि घायाळ करणाऱ्या अदा पाहायला मिळत आहेत. परदेसी गर्ल आत्मविश्वासाच्या जोरावर मराठमोळ्या 'बिग बॉस' प्रेमींची मने जिंकेल का? ग्लॅमरस परदेसी गर्ल 'बिग बॉस मराठी'च्या घरात जगण्यासाठी संघर्ष कसा करणार हे लवकरच पाहायला मिळणार आहे.
आता ही परदेसी गर्ल कोण आहे, यावरुन ग्रँड प्रीमियरमध्येच पडघा उघडणार आहे. मराठी मनोरंजनाचा 'बिग बॉस मराठी'चा ग्रँड प्रीमियर (BIGG BOSS Marathi Grand Premiere) या रविवारी 28 जुलै, रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर (Jio Cinema) पाहायला मिळणार आहे.
बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो पाहा
View this post on Instagram
रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार
काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी'चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोवरुन रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार असल्याचं स्पष्ट झालं. अशातच आता पुन्हा एकदा नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख यंदाचा सीझन वाजवायला सज्ज आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :