Oscar Awards 2024 Oppenheimer : अख्खा ऑस्कर 'ओपनहायमर'नेच गाजवला; सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्यासह 7 पुरस्कारांवर मोहोर
Oscar Awards 2024 Oppenheimer : यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर 'ओपनहायमर' चित्रपटाने आपला ठसा उमटवला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्यासह 6 पुरस्कार ओपनहायमरने आपल्या नावावर केले आहेत.
अमेरिकेतील लॉस एंजलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 96 अॅकेडमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहायमर'ने ठसा उमटवला. अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियरला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला. अभिनेता किलियन मर्फी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर क्रिस्टोफर नोलनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार Hoyte Van Hoytema याला मिळाला. त्याशिवाय, बेस्ट एडिटींगचा पुरस्कार जेनिफिर लेन याला मिळाला.
To close out the night, the Academy Award for Best Picture goes to... 'Oppenheimer'! #Oscars pic.twitter.com/nLWam9DWvP
— The Academy (@TheAcademy) March 11, 2024
Congratulations on your win for Best Directing, Christopher Nolan! #Oscars pic.twitter.com/sVsU31eYir
— The Academy (@TheAcademy) March 11, 2024
Christopher Nolan ("Oppenheimer") wins Best Director at the #Oscars pic.twitter.com/PBapGGVZAN
— Apurv Anand (@apurv_anand) March 11, 2024
Cillian Murphy’s acceptance speech after winning Best Actor at the #Oscars pic.twitter.com/7TUQ4H5XZ8
— Film Devotion (@FilmDevotion) March 11, 2024
'आर्यनमॅन' रॉबर्ट डाउनीला मिळाला कारकिर्दीतील पहिला ऑस्कर
अॅव्हेंजर सीरिजमधील आर्यनमॅन रॉबर्ट डाउनी ज्यूनिअर (Robert Downey Jr) याला आपल्या रुपेरी पडद्यावरील कारकिर्दीतील पहिला ऑस्कर पुरस्कार (Oscars 2024 ) मिळाला आहे. 'ओपनहायमर' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. रॉबर्ट डाउनी ज्यूनिअरला आतापर्यंत तीन वेळेस ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. मात्र, यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात रॉबर्टला काळी बाहुली उंचावण्याची संधी मिळाली.