Oscar 2024 : बिली इलिशने रचला इतिहास, कमी वयात कोरलं दोन ऑस्कर पुरस्कारांवर नाव, मोडला 87 वर्षांचा रेकॉर्ड
Oscar Award 2024 : बिली इलिशने वयाच्या 22 व्या वर्षी तिचा दुसरा ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे आणि यासोबत तिने 87 वर्ष जुना विक्रमही मोडला आहे.
Oscar Award 2024 : सध्या सगळीकडे ऑस्कर पुरस्कारांची (Oscar Award 2024) चर्चा आहे. या सोहळ्यात कोणी कोणत्या पुरस्कारावर नाव कोरलं याची उत्सुकता सगळ्यांमध्ये आहे. या सोहळ्यात 'ओपेनहायमर'ला (Openhimer) सर्वाधिक 7 पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर 'पूअर थिंग्स'ने 4 पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. याचदरम्यान बिली इलिश आणि फिनीस ओ'कॉनेल यांना सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवताना बिली इलिशने (Bill Eilish) मागील 87 वर्षांचा रेकॉर्ड देखील मोडित काढला.
अवघ्या 22 वर्षांची बिली हीने दोन वेळा ऑस्कर पुरस्कार मिळवला आहे. 'बार्बी' चित्रपटाच्या 'व्हॉट वॉज मेड फॉर?' या गाण्यासाठी बिलीला ऑस्कर पुरस्कार मिळाला. बिली आणि फिनास या दोघांनीही त्यांचं हे गाणं या सोहळ्यात सादर केलं. त्यांच्या या गाण्यावर भरभरुन प्रतिसाद देखील दिला.
View this post on Instagram
भावा बहिणीच्या जोडीने याआधी मिळवला होता ऑस्कर पुरस्कार
ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर बिली इलिशने मंचावर भाषण देखील केलं. यावेळी तिनं स्वत:ला भाग्यशाली म्हणत या पुरस्काराबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. याआधी बिली इलिश आणि फिनीस ओ'कॉनेल या भावा बहिणीच्या जोडीला डॅनियल क्रेग स्टारर जेम्स बाँड चित्रपटातील 'नो टाइम टू डाय' या गाण्यासाठी 2021 मध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.
HE'S JUST KEN.#RyanGosling#MargotRobbie#billieeilish#Oscars2024#Oscarspic.twitter.com/1WuuA4LlXp
— Mommy 🦈 (@urbandesimom) March 11, 2024
मोडला 87 वर्षांचा रेकॉर्ड
दरम्यान 22 वर्षीय बिलीने सिनेक्षेत्रातला 87 वर्षांचा इतिहास मोडत दुसऱ्यांदा ऑस्कर जिंकला आहे. बिलीने दुसरा ऑस्कर पुरस्कार जिंकत 28 वर्षांच्या लुईस रेनरचा विक्रम मोडित काढला. बिली तिच्या 'व्हॉट वॉज आय मेड फॉर?' या गाण्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. त्यासाठी तिला नामांकन देखील मिळाले होते. बार्बी या चित्रपटातील दुसरं गाणं आय एम जस्ट केन' या गाण्यासाठी देखील बिलीला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.
View this post on Instagram