सलमान अन् शाहरुख खानकडून पहलगाम हल्ल्यानंतर दु:ख व्यक्त करणारे ट्वीट, पण नितेश राणे म्हणतात...
Nitesh Rane on Shah Rukh Khan : सलमान अन् शाहरुख खानकडून पहलगाम हल्ल्यानंतर दु:ख व्यक्त करणारे ट्वीट, पण नितेश राणे म्हणतात...

Nitesh Rane on Shah Rukh Khan : "जे व्यक्ती अन्य वेळी देशभक्तीवर आपले चित्रपट काढून खिसे भरतात. मात्र पहलगाम हल्ला झाल्यानंतर साधं ट्विट पण पण पाहायला नाही. एवढा मोठा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत झाला. तेव्हा यांचं पाकिस्तानचं प्रेम उफाळून आलं असेल. यांना आपलं देशप्रेम दिसत नसेल, तर यांना आपण त्यांचे चित्रपट बघून मोठे का करावे?", असं मत मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि आमिर खान (Aamir Khan) यांच्याबद्दल मांडलं आहे. विशेष म्हणजे पहलगाम हल्ला झाल्यानंतर अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने दु:ख व्यक्त केलंय.
Words fail to express the sadness and anger at the treachery and inhumane act of violence that has occurred in Pahalgam. In times like these, one can only turn to God and say a prayer for the families that suffered and express my deepest condolences. May we as a Nation, stand…
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 23, 2025
महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढायच्या की स्वबळावर ? राणे म्हणाले, वरिष्ठ ठरवतील
नितेश राणे म्हणाले, जयंत पाटील यांची जागा रोहित पवार यांना घ्यायची होती, त्यामुळे रोहित पवार यांचं नवं षडयंत्र असू शकतं. लाडकी बहीण योजनेबाबत त्या खात्याच्या मंत्री आदिती ताई तटकरे या चांगली माहिती देऊ शकतील. महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढायच्या की स्वबळावर लढायच्या याचा निर्णय वरिष्ठ घेतील. जो निर्णय घेतील तो कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करू, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.
दोन्ही ठाकरे एकत्र न येण्यासाठी आदित्य ठाकरेंचा एक गट प्रयत्नशील ; नितेश राणे
पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, दुसऱ्याच्या घरात डोकवण्याची संजय राऊत याची घाणेरडी सवय आहे. दोन्ही ठाकरे एकत्र न येण्यासाठी आदित्य ठाकरेंचा एक गट प्रयत्नशील आहे, याची माहिती संजय राऊत का देत नाही. दोन्ही पवार एकत्र कधी यायचे ते ते ठरवतील. मात्र दोन्ही ठाकरे एकत्र येऊ नये, यासाठी मातोश्रीचा कुठचा माळा काम करतोय, याची थोडी माहिती संजय राऊत यांनी द्यावी.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























