Bigg Boss Marathi Season 5 : निक्कीच्या वागण्याचा अरबाजला त्रास; डीपी दादा म्हणाले, 'Control Yourself...'
Bigg Boss Marathi Season 5 : ज्या अरबाजने निक्कीला कॅप्टन केलं त्याच निक्की आणि अरबाजमध्ये सध्या बरेच राडे होत असल्याचं पाहायला मिळतंय.
![Bigg Boss Marathi Season 5 : निक्कीच्या वागण्याचा अरबाजला त्रास; डीपी दादा म्हणाले, 'Control Yourself...' Nikki Tamboli and Arbaz Patel fight DP Dhananjay Powar give advice to keep control Bigg Boss Marathi new season Bigg Boss Marathi Season 5 Bigg Boss Marathi Season 5 : निक्कीच्या वागण्याचा अरबाजला त्रास; डीपी दादा म्हणाले, 'Control Yourself...'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/27/2da1a480477c3c3796a3580b5226e0441724767214757720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) कॅप्टन्सीमध्ये फेल ठरल्याने अरबाजला त्याची कॅप्टन्सी सोडावी लागली. त्यावेळी त्याने निक्कीला घराची कॅप्टन केली. पण आता या दोघांमध्येच चांगली फूट पडल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता हीच कॅप्टन निक्की दरवेळी अरबाजला त्रास कसा होईल याचा प्रयत्न करतेय.
बिग बॉसच्या घरात कॅप्टनसी वरून एक वेगळाच वाद होत असल्याचा पाहायला मिळत आहे. अरबाजने त्याची कॅप्टनसी निक्कीला दिल्यापासून निक्की खूप बदलली आहे असे, अरबाज आणि टीम 'A 'मधल्या बाकी सदस्याचे देखील मत आहे.
डीपी दादांचा अरबाजला सल्ला
या विषयावरूनच अरबाज, वैभव DP दादांशी बोलताना दिसत आहे. बिग बॉसच्या नव्या प्रोमोत तूम्ही पाहू शकता की, अरबाज DP दादांना म्हणत आहे की," मला कंट्रोल नाही होत आता. मी कॅप्टनसी रूम सोडून बाहेर जात होतो झोपायला. बाथरूम साफ करत होतो, झाडू मारत होतो. ती मला म्हणते की, माझ्या कॅप्टनसीच्या रूममध्ये येऊ नकोस. माझ्या कॅप्टनसीवर अडथळा निर्माण होऊ शकतो. मला दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा त्रास नाही होत पण, जे माझ्या समोर घडत आहे ना त्याचा होत आहे आणि ती ते मुद्दमुन करत आहे." यावर DP दादा म्हणतात की," तू सोड यावर लक्ष देऊ नको."
निक्की, अरबाज आणि जान्हवीची जुंपली
'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये निक्की, वैभव आणि जान्हवीमध्ये झालेला राडा पाहायला मिळतोय. निक्की म्हणतेय,"बिग बॉस मराठीच्या घराची मी महाराणी आहे". त्यावर जान्हवी म्हणते,"तू नोकराणी पण होऊ शकत नाहीस". त्यावर निक्की वैभवला म्हणते,"कॅप्टन तरी तुम्ही होऊ शकता का?". निक्कीला उत्तर देत वैभव म्हणतो,"न्हासके... बास कर". त्यावर निक्की त्याला बच्चू आणि भुसनाळ्या म्हणते. पुढे वैभव निक्कीला म्हणतो,"तोंड दिलंय म्हणून काहीही बोलू नको. तुझी मस्ती जिरवली नाही ना तर बघ".
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)