एक्स्प्लोर

Nidhi Agrawal Viral Video: प्रभासच्या हिरोइनवर फॅन्स गिधाडासारखे तुटून पडले; निधी अग्रवालचा 31 सेकंदाचा व्हिडिओ थरकाप उडवेल, नेमकं घडलं काय?

तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श झाल्याचही या व्हिडिओत दिसतंय. कशीबशी गाडीपर्यंत पोहोचल्यानंतर निधी अत्यंत घाबरली होती. 

Nidhi Agrawal: बॉलीवूड असो टॉलीवूड असो किंवा मनोरंजन सृष्टीतील कुठलाही बडा सेलिब्रेटी असो, चाहत्यांचे सेलिब्रेटींविषयीचे वेड काही नवीन नाही. आतापर्यंत असे अनेक स्टार तुम्ही पाहिले असतील ज्यांना चाहत्यांच्या गैरव्यवहाराचा, जवळीकेचा त्रास झाला असेल. एखादा आवडीच्या सेलिब्रेटीला पाहण्यासाठी झुंबड उडाल्याचेही अनेक व्हिडिओ समोर येत असतात. चाहत्यांच्या गर्दीत अडकणं अनेकदा सेलिब्रेटीसाठी डोकेदुखी ठरते. असाच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या समोर आलाय. मुन्ना मायकल या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री निधी अग्रवाल (Nidhi Agrawal) एक विचित्र प्रकार घडलाय. गाण्याच्या लॉन्चदरम्यान आलेल्या निधीला कार्यक्रमातून बाहेर पडताना चहात्यांनी गराडा घातला. शेकडो चहात्यांच्यामध्ये अडकलेल्या निधीला बाहेर पडणं अवघड झालं. तिला तिचा ड्रेस वाचवावं लागल्याचे दिसलं. तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श झाल्याचही या व्हिडिओत दिसतंय. कशीबशी गाडीपर्यंत पोहोचल्यानंतर निधी अत्यंत घाबरली होती. 

नेमकं घडलं काय?

 निधी सध्या एका चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एका गाण्याच्या लॉन्चसाठी ती हैदराबादला पोहोचली होती. त्यावेळी चाहत्यांनी तिचा जोरदार स्वागत केले. पण कार्यक्रमाच्या ठिकाणाहून निघताना शेकडो चाहत्यांनी तिला वेढले. चाहत्यांच्या गराड्यात अडकलेल्या निधीला बाहेर पडणं अवघड झालं. या गर्दीनं नंतर नको ते स्वरूप घेतलं. निधीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न होऊ लागला. ढकलाढकलीत तिला स्वतःचा ड्रेस वाचवावा लागला. शेकडो चाहते तिच्यावर अक्षरशः तुटून पडताना दिसतात. शेवटी गार्डस तिला चाहत्यांच्या गर्दीतून गाडीपर्यंत पोहोचवताना दिसत आहेत. कशीबशी गाडीपर्यंत पोहोचल्यानंतर निधीचा जीव भांड्यात पडल्याचं दिसलं.  गाडीत बसल्यानंतरही गाडीभोवती चाहात्यांचा गराडा कायम होता. गाडीत बसल्यानंतर निधी अत्यंत घाबरलेली दिसली. 31 सेकंदाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अभिनेत्री सोबत घडलेल्या या विचित्र प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली असून अनेक जण या व्हिडिओवर चिंता व्यक्त करत आहेत. अनेकांनी या व्हिडिओखाली संतापजनक प्रकार असल्याचे लिहीत नाराजी व्यक्त करत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी ही या व्हिडिओवर राग व्यक्त केला आहे. निधी सध्या राजा साहब या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रभासची  मुख्य भूमिका आहे.

 

सोशल मीडियावर संतापाची लाट

निधी अग्रवालच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. चहात्यांचं वर्तन हे एखाद्या जनावरापेक्षा कमी नसल्याचं काही जणांनी म्हटलंय. तर अनेकांनी या वागण्याचा निषेध केला आहे. चहात्यांनी त्यांची मर्यादा ओलांडल्याचं अनेकांनी लिहिलंय. गायिका चिन्मय श्रीपदानेही या व्हिडिओवर आपला संताप व्यक्त केला असून " जनावरापेक्षाही वाईट वागणारा पुरुषांचा गट होता" असं तिने म्हटलं .चाहते इतक्या वाईट पद्धतीने वागत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

महत्त्वाच्या बातम्या

Golmaal 5 Distribution Rights : प्रदर्शनापूर्वीच 'गोलमाल 5' कमावणार तब्बल 100 कोटी; अजय देवगण-अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या हक्कांसाठी बड्या कंपन्यांमध्ये चुरस; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
प्रदर्शनापूर्वीच 'गोलमाल 5' कमावणार तब्बल 100 कोटी; अजय देवगण-अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या हक्कांसाठी बड्या कंपन्यांमध्ये चुरस; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
Eetha Film New Song: श्रद्धा कपूरची दिलखेचक अदा अन् प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची झलक; 'ईठा'मधील पहिलं गाणं रिलीज
श्रद्धा कपूरची दिलखेचक अदा अन् प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची झलक; 'ईठा'मधील पहिलं गाणं रिलीज
Avinash Narkar fathers death: 'समोर वडिलांचं पार्थिव अन् बाजूला आई..'; वडिलांच्या निधनानंतर अविनाश नारकर खचले, सांगितला भावूक प्रसंग
'समोर वडिलांचं पार्थिव अन् बाजूला आई..'; वडिलांच्या निधनानंतर अविनाश नारकर खचले, सांगितला भावूक प्रसंग
Zee Marathi Serials: झी मराठीच्या मालिकांमध्ये नवे ट्विस्ट; गुरूकुलमध्ये नवी सुरुवात, तारिणी उचलणार धाडसी पाऊल
झी मराठीच्या मालिकांमध्ये नवे ट्विस्ट; गुरूकुलमध्ये नवी सुरुवात, तारिणी उचलणार धाडसी पाऊल

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL Top Released Player List 2027: MS धोनीपासून ट्रॅव्हिस हेड, शिमरॉन हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
धोनीपासून हेड, हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Maharashtra Live blog updates: कांदिवलीत 15 वर्षांपासून प्रलंबित रस्ता रुंदीकरणातील 27 बांधकामे तोडली
Maharashtra Live blog updates: कांदिवलीत 15 वर्षांपासून प्रलंबित रस्ता रुंदीकरणातील 27 बांधकामे तोडली
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
Embed widget