एक्स्प्लोर

खडसेंकडून चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप, गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण

भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांनी काल एबीपी माझाशी बोलताना गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपलं तिकीट कापण्यासाठी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देताना गिरीश महाजन यांनी तिकीट वाटपाचा निर्णय हा भाजपच्या केंद्रीय कोअर कमिटीचा आहे. त्यात आमचा कोणताही संबंध नाही असे म्हटले आहे.

जळगाव : अनेक व्यासपीठावरुन उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी काल एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत थेट फडणवीस आणि महाजनांचं नाव घेतलं आहे. या दोन्ही नेत्यांमुळेच आपलं तिकीट कापल्याचा गंभीर आरोप खडसेंनी केला आहे. त्यामुळं भाजपात पुन्हा एकदा फडणवीस विरुद्ध खडसे असं चित्र निर्माण झालं आहे. मात्र गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. खडसेंकडून चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप होत असल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे. गिरीष महाजन म्हणाले की, नाथाभाऊंना चुकीची माहिती देण्यात आली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत असा कुठलाही विरोध किंवा चर्चा देखील झाली नाही. राज्यात चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, विनोद तावडे, राज पुरोहित यांना देखील तिकीट मिळाले नाही. कुणीतरी सांगितले म्हणण्यापेक्षा चुकीच्या माहितीच्या आधारे असं बोलणं चुकीचं आहे. याचा सोक्षमोक्ष होणं गरजेचं आहे, असे महाजन म्हणाले. चुकीच्या माहितीच्या आधारे असे आरोप करणे योग्य नाही, मी याबाबत खडसे यांच्याशी बोलेन, असेही महाजन म्हणाले. खडसे यांनी व्यवस्थित माहिती घेऊन चर्चा करावी. कुठंतरी मीटिंगमध्ये चर्चा झाली किंवा आम्ही विरोध केला अशा ऐकीव गोष्टीवरून टीका करू नये. केंद्रीय निवड समितीने या सर्व लोकांचा निर्णय केला आहे. त्यामुळे हे आरोप चुकीचे आहेत, असेही ते म्हणाले.
Eknath Khadse Exclusive | फडणवीस, महाजनांनी माझं राजकारण संपवण्याचा डाव जाणीवपूर्वक आखला, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप
कोअर कमिटीच्या वतीने केवळ खडसे यांचेच नव्हे तर अन्य दिग्गज नेत्यांचीही तिकीट कापली गेली आहेत. खडसे यांच्या मुलीला तरी तिकीट देण्यात आले होते. आम्ही तिकीट कापण्यासाठी प्रयत्न केले हे आरोप चुकीचं असल्याचं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं. काय म्हणाले आहेत खडसे स्वतःचं राजकारण सरळ करून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी मला तिकीट मिळू न देऊन आपलं राजकारण जाणीवपूर्वक संपवण्याचा डाव आखल्याचा खळबळजनक आरोप एकनाथराव खडसे यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत केला होता. मी प्रामाणिकपणे आजपर्यंत काम केलं आहे. त्यामुळे मला घाबरण्याचे कारण नाही. मी माघार घेणाऱ्यातला माणूस नाही. जे सत्य आहे ते मांडलं पाहिजे या विचारांचा मी आहे, असेही खडसे म्हणाले. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याविषयी नाराजी व्यक्त केल्यामुळेच आपल्याला तिकीट नाकारण्यात आल्याची माहिती कोअर कमिटीमधील आपल्या जवळच्या मित्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आपल्याला दिल्याचे खडसे यांनी म्हटलं आहे. आपल्याला तिकीट न दिल्याने आपल्यासह अजून दहा बारा जागांचं देखील पक्षाचं नुकसान एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या हट्टापाई झाल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. माझ्या आणि जेपी नड्डा यांच्या भेटीत त्यांना सर्व सांगितलं आहे. त्यांनी माझ्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेण्याचं आश्वासन मला दिलं आहे. त्यांच्या भेटीत माझं पूर्ण समाधान झालं असं नाही. मात्र मी भाजपतच आहे आणि भाजपतच राहणार असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. भाजपचं सरकार महाराष्ट्रात निश्चित आलं असतं. मात्र जनाधार असलेल्या निष्ठावानांना तिकीट दिलं नाही. जनाधार नसलेल्या बाहेरच्या उमेदवारांना तिकीटं देण्यात आली. आमच्याच उमेदवाराच्या समोर आमचेच बंडखोर उभे राहिले त्याचा फटका बसला. देवेंद्र फडणवीस एकटे प्रचार करीत फिरले. मात्र राज्यातील नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, गिरीश महाजन या दिग्गज नेत्यांना प्रचार करण्यास सांगण्यात आले नाही. त्यामुळे टीमवर्क उभं राहू शकले नाही त्यामुळे प्रचारावर परिणाम झाला, असेही ते म्हणाले. संबंधित बातम्या एकनाथ खडसे भविष्यात राज्याच्या विधीमंडळात किंवा दिल्लीत दिसतील, सुधीर मुनगंटीवारांचा दावा  निवडणुकीत पक्षविरोधी काम केलेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार, एकनाथ खडसेंना   Eknath Khadse on Loan Waiver | शेतकरी कर्जमाफीच्या निर्मयाचं एकनाथ खडसेंकडून स्वागत  Nagpur | खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेला उधाण, नागपूरात शरद पवारांची घेतली भेट | ABP  Eknath khadse I एकनाथ खडसेंचे तिकीट केंद्रीय नेतृत्वाने कापले - फडणवीस I एबीपी माझा  गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाबाबत खडसेंनी केलेला आरोप खोटा : देवेंद्र फडणवीस  Eknath Khadase I ज्यांना मोठे केले त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती - एकनाथ खडसे I एबीपी माझा 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget