एक्स्प्लोर

Eknath Khadse Exclusive | फडणवीस, महाजनांनी माझं राजकारण संपवण्याचा डाव जाणीवपूर्वक आखला, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

मी गेली चाळीस वर्षे राजकारणात असल्याने राजकारणापासून कधीही दूर राहू शकत नाही. मतदारसंघात असलेल्या काही कामानिमित्ताने मी मध्यंतरी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि कामानिमित्ताने यापुढेही ती घ्यावी लागली तर घेत राहील, असेही खडसे म्हणाले.

जळगाव : स्वतःचं राजकारण सरळ करून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी मला तिकीट मिळू न देऊन आपलं राजकारण जाणीवपूर्वक संपवण्याचा डाव आखल्याचा खळबळजनक आरोप एकनाथराव खडसे यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत केला आहे. मी प्रामाणिकपणे आजपर्यंत काम केलं आहे. त्यामुळे मला घाबरण्याचे कारण नाही. मी माघार घेणाऱ्यातला माणूस नाही. जे सत्य आहे ते मांडलं पाहिजे या विचारांचा मी आहे, असेही खडसे म्हणाले. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याविषयी नाराजी व्यक्त केल्यामुळेच आपल्याला तिकीट नाकारण्यात आल्याची माहिती कोअर कमिटीमधील आपल्या जवळच्या मित्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आपल्याला दिल्याचे खडसे यांनी म्हटलं आहे. आपल्याला तिकीट न दिल्याने आपल्यासह अजून दहा बारा जागांचं देखील पक्षाचं नुकसान एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या हट्टापाई झाल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. माझ्या आणि जेपी नड्डा यांच्या भेटीत त्यांना सर्व सांगितलं आहे. त्यांनी माझ्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेण्याचं आश्वासन मला दिलं आहे. त्यांच्या भेटीत माझं पूर्ण समाधान झालं असं नाही. मात्र मी भाजपतच आहे आणि भाजपतच राहणार असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. भाजपचं सरकार महाराष्ट्रात निश्चित आलं असतं. मात्र जनाधार असलेल्या निष्ठावानांना तिकीट दिलं नाही. जनाधार नसलेल्या बाहेरच्या उमेदवारांना तिकीटं देण्यात आली. आमच्याच उमेदवाराच्या समोर आमचेच बंडखोर उभे राहिले त्याचा फटका बसला. देवेंद्र फडणवीस एकटे प्रचार करीत फिरले. मात्र राज्यातील नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, गिरीश महाजन या दिग्गज नेत्यांना प्रचार करण्यास सांगण्यात आले नाही. त्यामुळे टीमवर्क उभं राहू शकले नाही त्यामुळे प्रचारावर परिणाम झाला, असेही ते म्हणाले. जळगाव जिल्हा परिषदेत भाजपचाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होईल. त्यासाठी लागणार बहुमत आपल्याकडे आहे आणि काही काँग्रेस पक्षाचे सदस्यही आपल्याकडे येणार असल्याने या ठिकाणी भाजपची सत्ता येणार असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. मी गेली चाळीस वर्षे राजकारणात असल्याने राजकारणापासून कधीही दूर राहू शकत नाही. मतदारसंघात असलेल्या काही कामानिमित्ताने मी मध्यंतरी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि कामानिमित्ताने यापुढेही ती घ्यावी लागली तर घेत राहील, असेही खडसे म्हणाले. सध्या मी पदावर नसलो तरी पक्षासाठी काम करतो आहे. मतदारसंघात फिरून जनतेची काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही खडसे म्हणाले. सध्या झालेल्या कर्जमाफीवर बोलताना खडसे यांनी म्हटलं की, पूर्वीच्या अटींप्रमाणेच या सरकारनेही अटी घातल्या आहेत. सरसकट कर्जमाफी करण्याचा दावा या सरकारने अगोदर केला होता. आपल्या दाव्याप्रमाणे या सरकारने सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी खडसे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget