Netflix Trending Docu-Series: 1 तास 42 मिनिटांची खरी क्राईम स्टोरी, Netflix वर गाजतेय भयावह डॉक्यू-सीरिज; IMDbवर शानदार रेटिंग
Netflix Trending Docu-Series : 'अ डेडली अमेरिकन मॅरेज' या नेटफ्लिक्स सीरिजची कथा जेसन कॉर्बेट नावाच्या एका आयरिश बिझनेसमनची आहे. ही सीरिज स्क्रिप्टेड कथा नाही, तर खऱ्याखुऱ्या स्टोरीवर आधारित आहे.

Netflix Trending Docu-Series : जर तुम्हाला 'क्राईम पेट्रोल' (Crime Patrol) किंवा 'सावधान इंडिया' (Savadhan India) सारखे शो पहायला आवडत असतील आणि खऱ्या क्राईम स्टोरीजमध्ये रस असेल, तर नेटफ्लिक्सवरील (Netflix) ही डॉक्युमेंटरी सीरिज (Documentary Series) तुम्हाला नक्कीच आवडेल. ही कोणीही रचलेली, स्क्रिप्टेड कथा नाही, तर खऱ्याखुऱ्या हत्या प्रकरणावर आधारित असलेली डॉक्यू-सीरिज आहे. कधीकाळी या सीरिजनं संपूर्ण जग हादरवलं होतं.
जर तुम्हाला खऱ्या गुन्हेगारी आणि थ्रिलर स्टोरीज पाहायला आवडत असतील, तर नेटफ्लिक्सवरील 'अ डेडली अमेरिकन मॅरेज' (A Deadly American Marriage) तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकते. ही डॉक्युमेंटरी सीरिज केवळ एका हत्येची कथा नाही, तर त्यात दाखवलेलं सर्व फुटेज, ऑडिओ क्लिप आणि फोटो खरे आहेत. म्हणजेच, तुम्हाला ती घटना जशी घडली तशीच अनुभवता येणार आहे. ही सीरिज 1 तास 42 मिनिटांची आहे.
'अ डेडली अमेरिकन मॅरेज' कशावर आधारित आहे?
ही कथा जेसन कॉर्बेट नावाच्या एका आयरिश बिझनेसमनची आहे. या बिझनेसमननं 2008 मध्ये त्याच्या पत्नीचं निधन झालं. त्याच्या मुलांचं संगोपन करण्यासाठी त्यानं मॉली मार्टेन्सला ऑ-पेअर (केअरटेकर) म्हणून कामाला ठेवलं. पत्नीच्या निधनानंतर जेसन कॉर्बेट फारच एकटा पडला होता. पाहता पाहता केअरटेकर आणि जेसन कॉर्बेट यांच्यात जवळीक वाढली आणि 2011 मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर दोघांचा सुखाचा संसार सुरू होता, पण काही वर्षांतच सर्व काही बदललं. जेसन कॉर्बेटनं दुसऱ्यांदा संसाराची बसवलेली घडी विस्कटली.
2 ऑगस्ट 2015 च्या रात्री, जेसनची हत्या करण्यात आली. हादरवणारी बाब म्हणजे, जेसनची हत्या इतर कुणीही केलेली नसून त्याची दुसरी पत्नी मॉली आणि तिचे वडील थॉमस मार्टेन्स यांनी केली. दोघांनीही बेसबॉल बॅट आणि काँक्रीट ब्लॉकनं जेसनची निर्घृण हत्या केली. पोलीस ज्यावेळी घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी त्यांना रक्तानं माखलेली खोली आणि शस्त्र सापडली. .
Instagram पर यह पोस्ट देखें
मॉली आणि थॉमस यांनी दावा केला की, जेसननं मॉलीचा गळा दाबला होता आणि तिचे वडील थॉमस तिला वाचवत होते, पण जेव्हा पोलिसांनी थॉमसचे 911 कॉल रेकॉर्डिंग ऐकले, तेव्हा संशय अधिकच वाढला. कॉलमधील त्याच्या शब्दांमध्ये अनेक विरोधाभास दिसून येत होते. इथून कथेत अधिक वळणं येऊ लागली.
2017 मध्ये कोर्टानं मॉली आणि थॉमस यांना सेकंड-डिग्री मर्डरचा दोषी ठरवलं आणि 20 ते 25 वर्षांची शिक्षा ठोठावली. पण, 2020 मध्ये पुन्हा या प्रकरणात अपील करण्यात आलं आणि निर्णय बदलला. 2023 मध्ये मॉलीनं 'नो कॉन्टेस्ट' आणि थॉमसनं दोषी असल्याची याचिका स्विकारली. ज्यामुळे जून 2024 मध्ये त्यांची सुटका झाली.
हत्येनंतर, जेसनची मुले जॅक आणि सारा यांना आयर्लंडला त्यांच्या मामी ट्रेसीकडे पाठवण्यात आलं. मॉलीनं मुलांचा ताबा मिळवण्यासाठी बरीच वर्ष कायदेशीर लढाई लढली. पण, न्यायालयानं मुलांची कस्टडी तिच्याकडे सोपवण्यास स्पष्ट नकार दिला. सुरुवातीला, मुलंही मॉलीच्या बाजूनं बोलली, पण नंतर असं उघड झालं की, मॉलीनं त्यांना तसंच बोलण्यासाठी पढवलं होतं. म्हणजेच, त्यांना तिला जे हवं ते बोलण्यास भाग पाडलं गेलं.
'A Deadly American Marriage' ही केवळ क्राईम स्टोरी नाही, तर ही मानवी मानसशास्त्र, नातेसंबंधांची गुंतागुंत आणि न्यायव्यवस्थेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करते. या सीरिजला IMDb वर 6.6 रेटिंग मिळालं आहे, जे लोकांचा तीव्र प्रतिसाद दर्शवते. ही नेटफ्लिक्सवर हिंदीसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे.
पाहा ट्रेलर :
महत्त्वाच्या इतर बातम्या :























