Anita Date Share Horror Experience: मध्यरात्री रस्त्यात एक बाई रडताना दिसली, ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली, पण त्यानं...; अनिता दातेनं सांगितला 'तो' भयानक किस्सा
Anita Date Share Horror Experience: सध्या अनिता दाते तिच्या जारण या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमांमध्ये अनितानं चेटूक करणाऱ्या स्त्रीचं पात्र साकारलं आहे. तर, अमृता सुभाष मुख्य भूमिकेत आहे.

Anita Date Share Horror Experience: झी मराठीवरील (Zee Marathi) 'माझ्या नवऱ्याची बायको' (Majhya Navaryachi Bayko) या लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अनिता दाते (Anita Date), सध्या तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. अनिता दाते, अमृता सुभाष (Amruta Subhash) स्टारर 'जारण' सिनेमा (Jarann Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काळी जादू, चेटूक यांसारख्या विषयावर आधारित सिनेमाचा ट्रेलर (Jarann Movie Trailer) काही दिवसांपूर्वीच रिलीज केला. या ट्रेलरनं सोशल मीडियावर (Social Media) दाणादाण उडवली होती. अशातच आता संपूर्ण सिनेमाची कास्ट प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच निमित्तानं अनिता दातेनं नुकतीच राजश्री मराठीला (Rajshri Marathi) मुलाखत दिली. यामध्ये बोलताना अनितानं नाटकाच्या प्रयोगांसाठी प्रवास करताना तिला आलेल्या भयानक अनुभवांबाबत सांगितलं.
सध्या अनिता दाते तिच्या जारण या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमांमध्ये अनितानं चेटूक करणाऱ्या स्त्रीचं पात्र साकारलं आहे. तर, अमृता सुभाष मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा सध्या प्रेक्षकांमध्येसुद्धा बराच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय. जारण, चेटूक यांसारख्या अंधश्रद्धांवर हा सिनेमा आधारित आहे, असं ट्रेलर पाहिल्यावर कळतंय. अशातच या सिनेमाच्या प्रमोशनवेळी अनितानं तिच्यासोबत घडलेल्या दोन प्रसंगांबाबत सांगितलं आहे. अनितानं 'जारण' सिनेमानिमित्त नुकतीच एक मुलाखत दिलेली, ज्यामध्ये तिने तिला आलेल्या दोन भयानक अनुभवांबद्दल तिनं सांगितलं.
काय म्हणाली अनिता दाते?
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अनिता दाते हिनं तिच्या नाटकांच्या दौऱ्यांचे किस्से शेअर केले. पहिला किस्सा सांगताना अनिता सांगू लागली की, "नाटकाच्या दौऱ्यासाठी आम्ही निघालो होतो. लातूरमध्ये आमचा प्रयोग होता त्यानंतर लातूरहून आम्हाला विदर्भात जायचं होतं. रस्त्यावरून जाताना पहाटे साडेतीन वाजता एक बाई दिसली. ती एकटीच चालत होती आणि रडत होती असं वाटत होतं. मी आणि माझी मैत्रीण तेव्हा ड्रायव्हरच्या शेजारी बसलो होतो. आम्हाला झोप येत नसल्यामुळे आम्ही ड्रायव्हरच्या शेजारी जाऊन बसलेलो. आम्ही त्या ड्रायव्हरला म्हटलं की थांबा ना ती बाई अशी रडत चालली आहे. त्यावर कोणीच काही बोललं नाही आमच्याशी आणि गाडी थेट पुढे नेली. त्यांनी कदाचित आम्हाला यातलं काही माहीत नाही असं वाटून गाडी थांबवली नसेल. ती खरंच बाई होती की दुसरं काही हे आम्हाला माहित नाही पण आज मला ते आठवल्यावर तिची भीती वाटते."
दुसरा किस्सा सांगताना अनिता दाते म्हणाले की, "गोव्यावरून येताना असं झालेलं की, तेव्हा आशालता वाबगावकर ताई गाडीत होत्या. तेव्हा चकवा लागल्यासारखं झालेलं आणि गाडी तिथेच फिरत होती. गोव्यातून आम्ही बाहेरच पडत नव्हतो मग आशाताईंनी गाडीतून सगळ्यांना बाहेर उतरवलं आणि मग आम्ही सगळे गाडीच्या समोर उभे राहिलो. त्यांनी काहीतरी मंत्र म्हटले आणि मग नारळ फोडला आणि आम्ही पुन्हा गाडीत जाऊन बसलो आणि गाडी निघाली.... त्यानंतर आम्ही बरोबर कोकणात शिरलो."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























