Nawazuddin siddiqui on NEET protestors: आंदोलक विद्यार्थ्यांसाठी 'किक' सिनेमाचा नवाजुद्दीन सिद्दीकी मैदानात उतरला, VIDEO शेअर करत काय म्हणाला?
Nawazuddin siddiqui Supports NEET protestors: आंदोलकांच्या समर्थनार्थ नवाजुद्दीन सिद्दीकी व्हिडीओत नेमकं काय म्हणाला?

Nawazuddin siddiqui Supports NEET Students: देशभरात सध्या नीट (NEET Protestors) पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा तापला आहे. 'कॉकरोज जनता पार्टीच्या' (Cockroach Janta party) समर्थनार्थ लोक रसत्यावर उतरले आहेत. 20 जुलै रोजी आंदोलक जंतर - मंतरहून संसदेबाहेर आंदोलनाला पोहोचले होते. अनेक आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. याच मुद्द्यावरुन अनेक सेलिब्रिटींनी आपला संताप व्यक्त केला. अलिकडेच बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भाष्य केलं आहे. देशात जे काही सुरू आहे, त्यामुळे आपण अजिबात खूश नाही आहोत, असं त्याने म्हटलं आहे.
विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ नवाजुद्दीन सिद्दीकी नेमकं काय म्हणाला? (Nawazuddin siddiqui Supports NEET Protestors Shares Video)
नवाजुद्दीन सिद्दीकीने सोशल मीडियात पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटलं की, तो एका नाटकासाठी बंगळूरूमध्ये आला होता. ज्याचे अनेक शोज पार पडले होते, काही शोज बाकी होते. या व्हिडीओत त्यांन देशात सुरू असलेल्या तापलेल्या मुद्द्यावरही भाष्य केलं आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या व्हिडीओत म्हटलं की, 'नमस्कार मित्रांनो.. मी यावेळी बंगळूरूमध्ये आहे. येथे आम्ही एक नाटक सादर करण्यासाठी आलो होतो. या नाटकाचं नाव नकाब असे आहे. याचे काही शोज झाले आहेत, तर काही बाकी आहेत.'
'यादरम्यान, मी थोडी मजा करु असं मला वाटलं. पण मी अजून भारतात आहे. कारण जे काही मी बातम्यांमध्ये पाहत आहे, ते पाहून मला खूप विचित्र वाटत आहे. एवढी मेहनत केल्यानंतर एखादं मूल परिक्षा देतं, नंतर त्याला स्वत:ला चीट फिलिंग येते. हे खूप अनफेअर आहे', असं नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या व्हिडीओत म्हणाला. 'विद्यार्थी आणि तरुणवर्ग हे आपल्या देशातील भविष्य आहे. त्यांची इतकीच मागणी आहे की, त्यांना न्याय मिळावा. तसेच ज्या पद्धतीने त्यांना वागणुक दिली जात आहे, त्यावर तोडगा निघायला हवा', असंही नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या व्हिडीओत म्हणाला.
नवाजुद्दीन सिद्दीकी याने आपल्या अभिनयातून वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे. त्याने सिनेमा तसेच वेब सिरीजमधून अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. केवळ नवाजुद्दीन सिद्दीकी नाही तर, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आता विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे. करिना कपूर, आलिया भट्ट, इब्राहिम अली खान, सारा अली खान, रकुलप्रीत सिंह, भूमी पेडनेकर, सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खानसह इतर दिग्गज कलाकारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















