Nawazuddin Siddiqui Bald Look: अरे बापरे, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या डोक्यावरचे केस गेले, टक्कल पडलं? व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते हैराण
Nawazuddin Siddiqui Bald Look: सलमान खानच्या क्लासी लूकच्या चर्चा सुरू असतानाच आता नवाजुद्दीन सिद्दिकीचा व्हिडीओ समोर आलाय. जो पाहून चाहते पुरते हैराण झाले आहेत.

Nawazuddin Siddiqui Bald Look: सेलिब्रिटी म्हटलं की, त्यांची पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ, याबद्दल अनेकांना उत्सुकता लागून राहते. मग, त्यांचं राहणं, खाणं सारंच लक्ष वेधून घेणारं ठरतं. नुकतेच सलमान खाननं शर्टलेस फोटो (Salman Khan Shirtless Look) शेअर करुन आपले सिक्स पॅक्स अॅब्स फ्लॉन्ट केले. काही दिवसांपूर्वी पोट वाढल्यामुळे साठीला टेकलेल्या सलमान खानला ट्रोल करण्यात आलेलं, पण आता त्याचा फिट अँड फाईन लूक पाहून चाहते भलतेच खूश झालेत. सलमान खानच्या क्लासी लूकच्या चर्चा सुरू असतानाच आता आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीचे (Bollywood Celebrity) काही फोटो समोर आलेत. पण, या सेलिब्रिटीला पाहून चाहते पुरते हैराण झाले आहेत.
नवाजुद्दीनच्या डोक्यावर टक्कल?
जेव्हा सेलिब्रिटी नव्या लूकमध्ये दिसतात, त्यावेळी चाहते आश्चर्यचकीत होतात, जर त्या सेलिब्रिटीचा लूक थोडा विचित्र असेल, तर हैराण होणं स्वाभाविकच. असंच काहीसं बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) बाबतीत झाल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. त्या व्हिडीओमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीचं टक्कल पडल्याचं दिसतंय. वाऱ्याच्या झोक्यासोबत उडणारे नवाजचे केस अचानक गेले कसे? याची चाहत्यांना काळजी लागून राहिली आहे. सोशल मीडियावर चाहते कमेंट करुन चिंता व्यक्त करत आहेत. पण, आम्ही तुम्हाला सांगतो की, अजिबात काळजी करू नका... कारण नवाजुद्दीन सिद्दीकी हा असा अभिनेता आहे, जो प्रत्येक भूमिकेत आपले प्राण ओततो. नवाजुद्दीनं सिद्दिकीनं आगामी सिनेमासाठी किंवा इतर प्रोजेक्टसाठी केलं असेल. त्याच्या टीमनं त्याचा लूक लपवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले, पण पॅपाराझींच्या कॅमेऱ्यानं सर्वकाही टिपलं.
View this post on Instagram
नवाजच्या नव्या लूकबाबत बोलायचं झालं तर, त्याचं अर्ध टक्कल पडलंय. डोक्यावर अर्ध टक्कल दिसतंय, तर बाजूला थोडेसे केस दिसतायत. त्यानं त्याच्या मिशाही वाढवल्यात. आता हे स्पष्ट आहे की, त्याचा लूक प्रोजेक्टशी संबंधित आहे. नवाजचा नवा व्हिडीओ पॅपाराझी पेज व्हायरल भयानीच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहण्यासाठी नेटिझन्स उत्सुक आहेत. कारण त्यांना माहिती आहे की, जर नवाज मेहनत घेत असेल, तर काहीतरी खास घडणार आहे. अशातच सोशल मीडियावरील एका कमेंटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय, त्यात लिहिलंय की, "जेम्स बाँड ऑफ इंडिया: अजित डोभाल" असं म्हटलं जातंय की, अजित डोभाल यांच्या बायोपिकमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीला कास्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























