71st National Film Awards Announced : शाहरुख खानला 33 वर्षांनी पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार, विक्रांत मेस्सीही बेस्ट अॅक्टर; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, संपूर्ण यादी पाहा
71st National Film Awards Announced Update : भारतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची 1 ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आली.

71st National Film Awards Announced : भारतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची 1 ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांसाठी निवड समितीने माहिती आणि प्रसारण विभागाचे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांना संबंधित अहवाल सादर केला होता. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत विजेत्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.
या वेळी अनेक मोठ्या कलाकारांनी आपले पहिले राष्ट्रीय पुरस्कार जिंकले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी हिला मिळाला, तर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार शाहरुख खान (जवान) आणि विक्रांत मैसी (12th फेल) या दोघांनी मिळून जिंकला. तिघांनी पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार पटकवला आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 च्या विजेत्यांची यादी
- सर्वोत्तम अभिनेत्री – राणी मुखर्जी (मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे)
- सर्वोत्तम अभिनेता – शाहरुख खान (जवान), विक्रांत मैसी (12th फेल)
- सर्वोत्तम लोकप्रिय चित्रपट – रॉकी आणि रानी की प्रेम कहानी
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सुदीप्तो सेन (द केरळ स्टोरी)
- सर्वोत्तम चित्रपट – 12th फेल
- सर्वोत्तम पटकथा लेखक – बेबी (तेलुगू) – साई राजेश नीलम
- सर्वोत्तम हिंदी चित्रपट : अ जॅकफ्रूट मिस्ट्री
सहाय्यक भूमिकांसाठी पुरस्कार :
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : विजय राघवन (पूकलम) आणि एम. सोमू भास्कर (पार्किंग)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : उर्वशी (उलोझुक्कू) आणि जानकी बोडीवाला (वश)
- सर्वोत्कृष्ट बालकलाकार : सुकीर्ती बंदिरेड्डी, कबीर खंडाणे, त्रिश ठोसर
तंत्रज्ञान आणि संगीतासाठी पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (गाणी) : जी.व्ही. प्रकाश कुमार (वाठी, तमिळ)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : हर्षवर्धन रामेश्वर (प्राणी)
- सर्वोत्कृष्ट गीतकार : कासरला श्याम - (बालागम)
- सर्वोत्कृष्ट पटकथा : साई राजेश नीलम (बेबी, तेलुगु)
- सर्वोत्कृष्ट संवाद : दीपक किंगराणी (सिर्फ एक बंदा काफी है)
- सर्वोत्कृष्ट संपादन : मिधुन मुरली (पुकलम)
- सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : प्रशांतनु महापात्रा (द केरळ स्टोरी)
- सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइन : सचिन सुधाकरन आणि हरिहरन मुरलीधरन (प्राणी)
भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट :
- तेलुगु : भगवंत केसरी
- तमिळ : पार्किंग
- मल्याळम : उल्लोझुक्कू
- मराठी : श्यामची आई
- गुजराती : वाश
- कन्नड : कंदीलू – आशेचा किरण
- बंगाली : डीप फ्रिज
- आसामी : रंगतापू 1982
71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात पहिल्यांदाच वेगवेगळ्या शैलीतील दोन कलाकारांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब मिळाला. शाहरुख खान हा एक मेगास्टार आहे, तर विक्रांत मेसी हा एक उत्तम कलाकार आहे.
























