लंडनच्या रेस्टॉरंटमध्ये लिओनार्डो डि कॅप्रिओसोबत दिसल्या नताशा पूनावाला, सोशल मीडियावर रंगल्या चर्चा
हॉलिवुड सुपरस्टार लिओनार्डो डि कॅप्रिओ आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक नताशा पूनावाला नुकतेच एकसोबत दिसले आहेत.
![लंडनच्या रेस्टॉरंटमध्ये लिओनार्डो डि कॅप्रिओसोबत दिसल्या नताशा पूनावाला, सोशल मीडियावर रंगल्या चर्चा Natasha Poonawala with hollywood superstar leonardo dicaprio in a London restaurant लंडनच्या रेस्टॉरंटमध्ये लिओनार्डो डि कॅप्रिओसोबत दिसल्या नताशा पूनावाला, सोशल मीडियावर रंगल्या चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/27/06834ac4be6474deb2367822897f0478_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
हॉलिवुड सुपरस्टार लिओनार्डो डि कॅप्रिओ आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक नताशा पूनावाला नुकतेच एकसोबत दिसले आहेत. मित्राच्या लग्नानंतर दोघांनाही लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये पाहण्यात आलं. हे दोघेही एकसोबत दिसल्यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे. यांच्या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नताशा या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांच्या पत्नी आहेत. नताशा यांचे अनेक बॉलीवूड कलाकारांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अभिनेत्री करीना कपूर खान, मलायका अरोरा, अमृता अरोरा आणि करिश्मा कपूर यांच्या गर्ल गँगमध्ये नताशा यांचाही समावेश आहे.
डेली मेलच्या वृत्तानुसार, ब्रिटीश व्होगचे संपादक एडवर्ड एनिनफुल (Edward Enninful) याचे अॅलेक मॅक्सवेलसीन (Alec Maxwellseen) हिच्यासोबत लग्न झाल्यानंतर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. लिओनार्डो, नाओमी कॅम्पबेल (Naomi Campbell) आणि ऑर्लॅंडो ब्लूम (Orlando Bloom) सारख्या हाई प्रोफाइल सेलिब्रिटींसह नताशा देखील या पार्टीत उपस्थित होत्या.
नताशा यांच्यासोबत लिओनार्डो खूपच कम्फर्टेबल होता. तसेच नताशा आणि लिओनार्डो यांच्यामध्ये मैत्रीशिवाय काहीही नाही, असा दावा डेली मेलने केला आहे. लिओनार्डोने याने या पार्टीत उपस्थित असलेल्या पाहुण्यांना गुलाब देखील दिल्याचे डेली मेलच्या वृत्तात सगण्यात आले आहे.
दरम्यान, नताशा आणि अदर यांचे 2006 साली लग्न झाले. त्यांना दोन मुले आहेत. नताशा या अनेकदा करण जोहर आणि करीना कपूर यांसारख्या बॉलिवूड स्टार्सच्या पार्टीमध्ये दिसल्या आहेत. त्या करीना, करण आणि दिलजीत दोसांझच्या वोग कव्हर शूटचा देखील एक भाग होत्या. नताशा या प्रियांका चोप्राच्याही जवळ्या मैत्रीण आहेत. त्यांनी अनेकदा तिच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
संबंधित इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)