एक्स्प्लोर

Nagarjuna Akkineni Net Worth : 3100 कोटींच्या संपत्तीचा मालक, फक्त अभिनयच नाही तर व्यवसायातूनही कमावतो नागार्जुन

Nagarjuna Akkineni : नागार्जुन तेलगू इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत सुपरस्टार आहे. नागार्जुन हे चित्रपटात काम करत नसले तरी दरमहा आणि वर्षभरात करोडो रुपये कमावतात.

Nagarjuna Akkineni Birthday Special :  दाक्षिणात्य चित्रपटसृ्ष्टीवर आपली छाप सोडणारे  अभिनेते नागार्जुन आज 65 वा वाढदिवस साजरा करत आहे. नागार्जुन यांनी सिनेइंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.  नागार्जुन यांनी केवळ चित्रपटांमध्येच नाव कमावले नाही तर वैयक्तिक आयुष्यासाठीही ते नेहमीच चर्चेत राहिले. नागार्जुन तेलगू इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत सुपरस्टार आहे. नागार्जुन हे चित्रपटात काम करत नसले तरी दरमहा आणि वर्षभरात करोडो रुपये कमावतात. 

नागार्जुन हे मागील चार दशकांपासून तेलुगू इंडस्ट्रीत सक्रिय आहे. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटांमधून त्याने भरपूर कमाई केली आहे. अभिनयासोबतच नागार्जुन अनेक व्यवसायही चालवतात. त्यामुळे नागार्जुन चित्रपटात  काम करत नसतानाही त्यांचे उत्पन्न सुरू आहे. 

3100 कोटींची आहे संपत्ती

'फायनान्शिअल एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार नागार्जुन हे 3100 कोटींच्या संपत्तीचे मालक आहे. केवळ अभिनयच नाही तर नागार्जुन हे चित्रपट निर्मिती आणि स्टुडिओमधून भरपूर पैसे कमावतात. चित्रपटांसोबतच नागार्जुन बिग बॉस तेलुगूचेही सूत्रसंचालन करतात. त्यांचा एक स्टुडिओही आहे. ते No3 रियल्टी एंटरप्रायझेस, रिअल इस्टेट आणि बांधकाम फर्मचे प्रमुख देखील आहेत. वृत्तानुसार, नागार्जुन यांच्या मालकीच्या सर्व स्थावर मालमत्तेची किंमत सुमारे 800 कोटी रुपये आहे.

नागार्जुन यांच्याकडे स्पोर्टस् टीमची मालकी

नागार्जुन हे क्रीडा प्रेमी आहेत. ते काही स्पोर्ट्स टीमचे मालकही आहेत. यामध्ये बॅडमिंटन लीगमधील मुंबई मास्टर्स, एफआयएम सुपरस्पोर्ट्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये माही रेसिंग टीम इंडिया आणि इंडियन सुपर लीगमधील केरला ब्लार्स्ट एफसी यांचा समावेश आहे. ब्रॅण्ड एन्डोर्समेंटच्या माध्यमातून नागार्जुन यांची चांगली कमाई होते. 

नागार्जुन यांनी दोनदा लग्न केले आहे. त्यांचे पहिले लग्न लक्ष्मी दग्गुबतीसोबत झाले होते. हे नाते फार काळ टिकले नाही. त्यानंतर त्याने अमलासोबत दुसरे लग्न केले. आता नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. नागाने नुकतेच शोभिता धुलीपालासोबत साखरपुडा झाला. याची माहिती खुद्द नागार्जुनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jammu And Kashmir : प्रचारासाठी पीएम मोदींचा दौरा असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये चकमक सुरु; दोन जवान शहीद, तीन दहशतवादी ठार
प्रचारासाठी पीएम मोदींचा दौरा असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये चकमक सुरु; दोन जवान शहीद, तीन दहशतवादी ठार
Emergency Loan : अचानक पैशांची गरज पडल्यास काय करावं? कशी करालं पैशांची व्यवस्था? हे 4 मार्ग देतील आधार
Emergency Loan : अचानक पैशांची गरज पडल्यास काय करावं? कशी करालं पैशांची व्यवस्था? हे 4 मार्ग देतील आधार
Jalegaon News:  मोठी बातमी: जळगावात गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात आक्रित घडलं, भंडाऱ्यातील जेवणातून 70 विद्यार्थ्यांना विषबाधा
मोठी बातमी: जळगावात गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात आक्रित घडलं, भंडाऱ्यातील जेवणातून 70 विद्यार्थ्यांना विषबाधा
Vande Bharat Express In Kolhapur : कोल्हापूरकरांची उत्सुकता शिगेला; बहुचर्चित वंदे भारत ट्रेनची कोल्हापुरात चाचणी, आरक्षण केव्हापासून सुरु होणार?
कोल्हापूरकरांची उत्सुकता शिगेला; बहुचर्चित वंदे भारत ट्रेनची कोल्हापुरात चाचणी, आरक्षण केव्हापासून सुरु होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Marathi language : योग्य निर्णय ! ल्या सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 14 Spet 2024 : 10 AMABP Majha Headlines : 10 AM : 14 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 सप्टेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jammu And Kashmir : प्रचारासाठी पीएम मोदींचा दौरा असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये चकमक सुरु; दोन जवान शहीद, तीन दहशतवादी ठार
प्रचारासाठी पीएम मोदींचा दौरा असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये चकमक सुरु; दोन जवान शहीद, तीन दहशतवादी ठार
Emergency Loan : अचानक पैशांची गरज पडल्यास काय करावं? कशी करालं पैशांची व्यवस्था? हे 4 मार्ग देतील आधार
Emergency Loan : अचानक पैशांची गरज पडल्यास काय करावं? कशी करालं पैशांची व्यवस्था? हे 4 मार्ग देतील आधार
Jalegaon News:  मोठी बातमी: जळगावात गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात आक्रित घडलं, भंडाऱ्यातील जेवणातून 70 विद्यार्थ्यांना विषबाधा
मोठी बातमी: जळगावात गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात आक्रित घडलं, भंडाऱ्यातील जेवणातून 70 विद्यार्थ्यांना विषबाधा
Vande Bharat Express In Kolhapur : कोल्हापूरकरांची उत्सुकता शिगेला; बहुचर्चित वंदे भारत ट्रेनची कोल्हापुरात चाचणी, आरक्षण केव्हापासून सुरु होणार?
कोल्हापूरकरांची उत्सुकता शिगेला; बहुचर्चित वंदे भारत ट्रेनची कोल्हापुरात चाचणी, आरक्षण केव्हापासून सुरु होणार?
अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, दोन ट्रक थेट दुकानात घुसले
अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, दोन ट्रक थेट दुकानात घुसले
Dhananjay Munde : खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलं, कृषीमंत्री मुंडेंनी मानले सरकारचे आभार, सोयाबीनच्या दरात वाढ होणार
खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलं, कृषीमंत्री मुंडेंनी मानले सरकारचे आभार, सोयाबीनच्या दरात वाढ होणार
Eknath Khadse on Majha Katta : भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय का घेतला होता? एकनाथ खडसेंनी सांगितलं पडद्यामागचं राजकारण; म्हणाले...
भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय का घेतला होता? एकनाथ खडसेंनी सांगितलं पडद्यामागचं राजकारण; म्हणाले...
मोठी बातमी! आयकर विभागाचा दणका, देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीचे कर्मचारी संकटात, लाखो रुपयांच्या नोटिसा
मोठी बातमी! आयकर विभागाचा दणका, देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीचे कर्मचारी संकटात, लाखो रुपयांच्या नोटिसा
Embed widget