Lata Mangeshkar Passes Away: लता मंगेशकरांच्या निधनाने अवघ्या संगीतविश्वावर शोककळा, दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
Lata Mangeshkar : लतादीदींच्या जण्याने अवघ्या संगीतक्षेत्रावरही शोककळा पसरली आहे. राहुल देशपांडेंपासून ते एआर रहमानपर्यंत अनेक दिग्गज संगीतकार आणि गायकांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.
Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज (6 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता दीदींच्या प्रकृतीतही सुधारणा होत होती, मात्र शनिवारी प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
लतादीदींच्या जण्याने अवघ्या संगीतक्षेत्रावरही शोककळा पसरली आहे. राहुल देशपांडेंपासून ते एआर रहमानपर्यंत अनेक दिग्गज संगीतकार आणि कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.
आम्ही पोरके झालो : राहुल देशपांडे
कळत नाहीये काय बोलू.. मला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा मी ढसाढसा रडलो. लहानपणापासून लतादीदींचा इतका सहवास लाभला आहे. लता मंगेशकर म्हणजे स्वरांची माऊली. त्या अतिशय प्रेमळ होत्या, मायाळू होत्या. आज खऱ्या अर्थाने आम्ही पोरके झालो. ही पोकळी न भरून निघणारी आहे. पण त्यांचा आवाज कायम चिरंतन राहील.
प्रेम, आदर आणि प्रार्थना : ए आर रहमान
ऑस्कर विजेता संगीतकार ए आर रहमान यांनी देखील लता मंगेशकर यांच्यासोबतच फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आमचं दैवत देहरुपाने अमच्यातून निघून गेलं : वैशाली सामंत
लोकप्रिय गायिका वैशाली सामंत यांनी देखील आपल्या भवन व्यक्त केल्या आहेत.
माझ्यासाठी त्या माँ सरस्वती : कुमार सानू
त्यांच्यासारखं दुसरं कुणीच नाही : नेहा कक्कर
माझ्याकडे शब्दच नाहीत : विशाल ददलानी
ही पोकळी भरून निघणार नाही : मोहित चौहान
संबंधित इतर बातम्या :
Lata Mangeshkar passes away : युग संपले! लतादीदींच्या निधनानंतर संजय राऊत यांचे ट्वीट
Lata Mangeshkar Death : गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Remembering Lata Mangeshkar LIVE: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha