एक्स्प्लोर

Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?

Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: मुंबई पोलिसांनी गिरगाव परिसरात एका हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आणि संपूर्ण शहरात खळबळ माजली. हे संपूर्ण रॅकेट एका आलिशान हॉटेलमधून चालवलं जात होतं.

Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: मुंबईतील (Mumbai News) सुसंस्कृत परिसर असलेल्या गिरगाव (Girgaon) छुप्या पद्धतीनं सुरू असलेल्या एका हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा (High-Profile Sex Racket) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठा शिताफिनं पर्दाफाश केलाय. हे प्रकरण समोर आल्यानंतर स्वप्नांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या झगमगाटामागचं गडद काळ्याकुट्ट अंधारानं व्यापलेलं जग समोर आलं आणि खळबळ माजली. या घटनेत आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, मुंबई पोलिसांनी या सेक्स रॅकेटमधून (Sex Racket) दोन अभिनेत्रींची सुटका केलीय. त्यापैकी एक मराठीतली आघाडीची अभिनेत्री (Marathi Actress) असून दुसरी बॉलिवूडमध्ये (Bollywood News) छोट्या-मोठ्या भूमिका साकारणारी अभिनेत्री असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, मुंबई पोलिसांनी सुटका करण्यात आलेल्या महिलेची ओळख उघड केलेली नाही. 

मुंबई पोलिसांनी गिरगाव परिसरात एका हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आणि संपूर्ण शहरात खळबळ माजली. हे संपूर्ण रॅकेट एका आलिशान हॉटेलमधून चालवलं जात होतं. विशेष म्हणजे, या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन अभिनेत्रींची सुटका केलीय आणि एका एजंटला घटनास्थळीच रंगेहाथ अटक केलीय. मुंबई गुन्हे शाखेच्या 'मानवी तस्करी विरोधी कक्षा'नं (Anti-Human Trafficking Cell) ही कारवाई केली. हे रॅकेट बऱ्याच काळापासून कार्यरत असल्याची माहिती समोर येतेय. मुंबई पोलिसांनी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर आणि आवश्यक ती तयारी पूर्ण केल्यानंतर छापा टाकला. या रॅकेटमध्ये अनेक बड्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जातेय.

मराठी आणि बॉलिवूडच्या 2 अभिनेत्रींची सुटका (Marathi Actress Lured Into Trap With Promise Of Money)

मुंबई पोलिसांनी दोन अभिनेत्रींची या हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटमधून सुटका केलीय. या दोन्ही अभिनेत्री सिनेसृष्टीत कार्यरत असून त्यांनी अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सुटका करण्यात आलेल्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे, जिनं अनेक सिनेमांत मुख्य भूमिका केल्यात, तर दुसरी अभिनेत्री बंगाली आणि हिंदी सिनेमांमध्ये छोट्या आणि 'कॅमिओ' भूमिकांमध्ये झळकलीय. हे रॅकेट चालवताना रंगेहाथ पकडलेला एजंट प्रत्यक्षात एक 'मेकअप आर्टिस्ट' आहे, जो विविध सेलिब्रिटींसोबत काम करतो. त्यानंच या अभिनेत्रींना या रॅकेटमध्ये ओढलेलं, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आलीय. पोलिसांनी आरोपी मेकअप आर्टिस्टला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. 

मुंबई पोलिसांनी कसा केला हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेट पर्दाफाश? (Mumbai Police Bust High-Profile Sex Racket)

मुंबई पोलिसांना गिरगावातील सेक्स रॅकेटबाबत माहिती मिळालेली. या बेकायदेशीर कृत्यांची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी सर्वात आधी हॉटेलमध्ये एक बनावट ग्राहक पाठवला. व्यवहार निश्चित होऊन पोलिसांना तसा संदेश मिळताच, पथकानं त्वरित छापा टाकला आणि त्या महिलांची सुटका केली. पोलिसांच्या माहितीनुसार, या महिलांना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं होतं आणि त्यांच्या सेवांसाठी ग्राहकांकडून अवाढव्य रक्कम उकळली जात होती. सुरक्षितता आणि गोपनीयतेचा विचार करून, मुंबई पोलिसांनी सुटका करण्यात आलेल्या दोन्ही अभिनेत्रींची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवलीय.

मोठी नावं समोर येण्याची शक्यता (Girgaon High Profile Prostitution Racket)

मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आता या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आणि कसून तपास करतेय. पोलीस आर्थिक व्यवहारांच्या नोंदींची बारकाईनं तपासणी करत आहेत. त्याचबरोबर, या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींची कसून चौकशी केली जातेय, हॉटेल व्यवस्थापनाचा यात काही सहभाग आहे का? याचाही तपास सुरू आहे. हे एक 'हाय-प्रोफाईल' रॅकेट मानलं जात असून त्यात बड्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आगामी काळात आणखी काही महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Urmila Kanetkar Cryptic Post After Divorce: घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget