Mrunal Thakur : 'मी ऑडिशनला जात होते तेव्हा...'; मृणाल ठाकुरनं सांगितला किस्सा
Mrunal Thakur : एका मुलाखतीमध्ये मृणालनं तिच्या ऑडिशनबाबत सांगितले.

Mrunal Thakur : छोट्या पडद्यावरील मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) सध्या तिच्या जर्सी या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. मृणालनं 2012 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या 'मुझसे कुछ कहते हैं.. ये खामोशियां' या मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर तिला 'कुमकुम भाग्य' या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. एका मुलाखतीमध्ये मृणालनं तिच्या ऑडिशनबाबत सांगितले.
तिनं ऑडिशनबबत एका मुलाखतमीमध्ये सांगितलं, 'मला लोकांचे मनोरंजन करायचे आहे. मी खूप भाग्यवान आहे की मला वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मी कष्ट करू शकते. मी खूप संघर्ष केला आहे. मी निर्लज्जपणे ऑडिशनसाठी जात होते. जोपर्यंत माझा टेक घेतला जात नव्हता तोपर्यंत मी तिथेच थांबत होते. मी खूप हट्टी होतो आणि अजूनही आहे."
View this post on Instagram
लव सनिया या चित्रपटामधून मृणालनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिनं सुपर 30, बाटला हाऊस आणि धमाका या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली. लवकरच तिचा जर्सी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील मृणाल आणि अभिनेता शाहिद कपूर यांची केमिस्ट्री पाहण्यााठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
हेही वाचा :
- Indian Idol Marathi : 'इंडियन आयडल मराठी'च्या महाअंतिम सोहळ्यात 'चंद्रमुखी' सिनेमातील 'बाई गं' गाणं होणार लॉंच
- Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार'मध्ये राजकीय मेजवानी; कॉंग्रेस, भाजप आणि मनसेचे 'हे' बडे नेते लावणार हजेरी
- Jayeshbhai Jordaar Poster : 'जयेशभाई जोरदार'चे पोस्टर रिलीज; रणवीरने विचारलं, जयेशभाईंना मुलगा होणार की मुलगी?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
