(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mrinal Kulkarni : जिजाऊंची भूमिका माझ्यासाठी शिदोरीच, हा पुरस्कारपेक्षा कमी सन्मान नाही, फेवरेट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारनंतर मृणाल कुलकर्णींनी व्यक्त केल्या भावना
Mrunal Kulkarni : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना महाराष्ट्राचा फेवरेट कोण या पुरस्कार सोहळ्यात फेवरेट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
Mrunal Kulkarni : 'झी टॉकीज' वाहिनीवर 'महाराष्ट्र फेवरेट कोण?' या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांना 'सुभेदार' (Subhedar) या सिनेमातील जिजाऊंच्या भूमिकेसाठी ‘महाराष्ट्राची फेवरेट सहाय्यक अभिनेत्री’ म्हणून पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. हा एक पुरस्कार तर आहेच पण दुसरा पुरस्कार म्हणजे शिवाजी महाराजांच्या आऊसाहेब जिजाबाई यांची भूमिका साकारण्याची संधी हा माझ्यासाठी पुरस्कारापेक्षा कमी सन्मान नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी मृणाल कुलकर्णी यांनी दिली.
‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२३’ या पुरस्कार सोहळ्यात सुभेदार या सिनेमातील जिजाऊ आईसाहेबांच्या भूमिकेसाठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना प्रेक्षक पसंतीतून दिला जाणारा महाराष्ट्राची फेवरेट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. शिवराज अष्टक मालिकेतील पाचवे पुष्प असलेल्या ‘सुभेदार’ या सिनेमातील जिजाऊंच्या भूमिकेसाठी मृणाल कुलकर्णी यांना नामांकन मिळाले होते. महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी या भूमिकेला पसंतीचा कौल दिला.
अभिनेत्री म्हणून मला जास्त घडवले - मृणाल कुलकर्णी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ,पराक्रम ,स्वराज्यध्यास वाचत आणि पाहत घडलेल्या पिढीचा मी पण एक भाग आहे. व्यक्ती म्हणून शिवराज्य समजून घेणे मला नेहमीच भावतं पण अभिनेत्री म्हणून मला शिवराज्याने जास्तच घडवले याचा अभिमान वाटतो, असंही मृणाल कुलकर्णी यांनी यावेळी म्हटलं. ’महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२३’ या झी टॉकीज वाहिनीने जाहीर केलेल्या पुरस्कार सोहळ्यात मला एक नव्हे तर दोन पुरस्कार दिले. पहिला पुरस्कार म्हणजे सुभेदार या सिनेमातील जिजाऊ आऊसाहेब जिजाबाई या भूमिकेसाठी प्रेक्षकांच्या पसंतीचा ‘महाराष्ट्राची फेवरेट सहाय्यक अभिनेत्री’ हा पुरस्कार तर दुसरा पुरस्कार म्हणजे शिवाजी महाराजांच्या आऊसाहेब जिजाबाई यांची भूमिका साकारण्याची संधी हा माझ्यासाठी पुरस्कारापेक्षा कमी सन्मान नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
'ही भूमिका साकारणं माझ्यासाठी शिदोरीच'
महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? ‘ पुरस्कार मिळणे म्हणजे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणे हे समीकरण आहे याचाही मला आनंद आहे .ज्या शिवरायांना जिजाऊंनी घडवले त्या व्यक्ती, महिला म्हणून किती खंबीर आणि कणखर होत्या हे ही भूमिका जगताना मला कळाले. खऱ्या आयुष्यात या भूमिकेने मलाही कणखर बनण्याची प्रेरणा दिली आहे. जिजाऊंच्या आयुष्यातील तारुण्य ते वृद्धत्व अशा छटा साकारत असताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकलेल्या गोष्टी माझ्यासाठी शिदोरी आहेत. चित्रीकरणाचा अनुभव देखील खूप छान होता. गड किल्ल्यांवर काही प्रसंग चित्रित करताना, हे ते स्थान आहे जिथे शिवकाळ प्रत्यक्ष घडला ही भावना सुखावणारी आहे. अशा प्रकारच्या भूमिका मनावर कायम कोरलेल्या राहतील.” अशी प्रतिक्रिया मृणाल कुलकर्णी यांनी दिली.